महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद 315 अन्वये महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवा नोकऱ्यांसाठी अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी निर्माण केलेली संस्था आहे. आता आयोगाने सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क संवर्गातील एकूण 900 पदांच्या भरतीकरीता, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची (Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination 2021) जाहिरात आयोगाने प्रसिद्ध केली आहे. या पदांमध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभागातील विविध जागांचा सामावेश आहे.
परीक्षेचे नाव - महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021
एकूण जागा – 900
पदे –
उद्योग निरीक्षक (गट-क) - उद्योग संचालनालय - 103
दुय्यम निरीक्षक (गट-क) - राज्य उत्पादन शुल्क - 114
तांत्रिक सहायक (गट-क) - विमा संचालनालय - 14
कर सहाय्यक (गट-क) - 117
लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क - 473
लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क – 79
पात्रता-
पद क्र.1: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी. (हेही वाचा: MHADA Exam 2021 Revised Dates: म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा च्या नव्या तारख्या जाहीर; 1-15 फेब्रुवारी दरम्यान होणार परीक्षा)
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: पदवीधर
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.6: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा -
01 एप्रिल 2022 रोजी, (मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट)
पद क्र.1, 5 & 6 - 19 ते 38 वर्षे.
पद क्र.2, 3, & 4 - 18 ते 38 वर्षे.
शुल्क –
- खुला प्रवर्ग: 394 रुपये
- मागासवर्गीय & अनाथ: 294 रुपये
यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 ही आहे. पूर्व परीक्षा 03 एप्रिल 2022 रोजी होईल. उमेदवारांनी अधिक तपशीला साठी https://mpsconline.gov.in/candidate संकेतस्थळावर भेट द्यावी.