MPSC State Service Admit Card 2020: महाराष्ट्रात राज्यसेवा पूर्व परीक्षा 20 सप्टेंबरला लवकरच रीलीज होणार अ‍ॅडमीट कार्ड; mpsc.gov.in वरून कसं कराल डाऊनलोड
Online | Photo Credits: Pixabay.com

MPSC Admit Card 2020:  महाराष्ट्रामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा (MPSC Prelims Exam) यंदा 13 सप्टेंबरला होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र आता देशात NEET 2020 परीक्षांची आणि MPSC ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने कोरोना संकटकाळात प्रशासकीय यंत्रणेवरील भार आणि परीक्षा केंद्रावरील सुरक्षा जपण्यासाठी महाराष्ट्रात राज्यसेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 20 सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मात्र विद्यार्थ्यांना अद्याप एमपीएससी परीक्षांची अ‍ॅडमीट कार्डस देण्यात आलेली नाहीत. अंदाजे ऑगस्ट महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात  MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर अ‍ॅडमीट कार्ड्स (Admit Card) देखील उपलब्ध करून दिली जातील. उमेदवारांना ऑनलाईन अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध असेल.

MPSC State Service Admit Card ऑनलाईन डाऊनलोड कसं कराल?

महाराष्ट्रामध्ये MPSC ची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना कॉल लेटर डाऊनलोड करण्यासाठी क्रेंडेन्शिअल्सची (लॉगिन आयडी/ पासवर्ड) याची गरज आहे. दरम्यान जाणून घ्या ऑनलाईन एमपीएससीची परीक्षा देणारे विद्यार्थी अ‍ॅडमीट कार्ड्स कसे डाऊनलोड करू शकतात?

  • MPSC ची अधिकृत वेबसाईट mahampsc.mahaonline.gov.in वर क्लिक करा.
  • MPSC च्या होम स्क्रिनवर डाव्या बाजूला तुम्हांला लॉगिन सेक्शन दिसेल. तिथे तुम्हांला युजरनेम, पासवर्ड देणं आवशयक आहे.
  • अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी पासवर्ड, लॉगिन आयडी एन्टर करून ‘login’बटनावर क्लिक करा.
  • नव्या ओपन झालेल्या स्क्रिनवर तुम्हांला ‘my account’चा पर्याय दिसेल.
  • डाव्या बाजूला ‘competitive exam’चा पर्याय दिसेल.
  • पोस्टचं नाव, वर्ष निवडा आणि application ID वर टीक करा.
  • तुमच्या स्क्रीनवर MPSC State Service Admit card दिसेल. त्यानंतर डाउनलोड बटणावर क्लिक करून प्रिंट काढा.

दरम्यान एमपीएससीच्या उमेदवारांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड शिवाय देखील अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची सोय आहे. त्यासाठी ‘click here to download hall ticket without username and password' असा होमपेजवर दिसणारा पर्याय क्लिक करा.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिट कार्डवर त्यांचे नाव, लिंग, सेंटर कोड, रोल नंबर, Prelims किंवा main examination चा उल्लेख, उत्तर परीक्षा लिहण्याची भाषा, फोटो, परीक्षेचं नाव, वेळ, रिपोर्टिंग टाईम आणि महत्त्वाच्या सूचना यांचा उल्लेख केलेला असतो.

दरम्यान महाराष्ट्रात एमपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या वेळापत्रकाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्या लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. दरम्यान पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांच्या गुणांची बेरीज करून अंतिम निकाल आणि सिलेक्शन झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाते. काही दिवसांपूर्वी 2019 सालच्या परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.