राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाने शिवसेना ( Shiv Sena) पक्षाचा पाठिंबा काढल्यास राष्ट्रहितासाठी भारतीय जनता पक्ष ठाकरे सरकारला पाठिंबा देऊ शकतो, असे विधान भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी (MP Subramanian Swamy) यांनी केले आहे. स्वामी यांनी ट्विटरद्वारे आपले मत व्यक्त केले आहे. खा. स्वामी यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला मुद्दा नक्कीच मिळाला आहे. मात्र, तशी वेळ येईल की नाही हेसुद्धा जर तरच्याच गोष्टी आहेत. शिवसेना आज आपला 54 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. खा. स्वामी यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी (17 जून) ट्विट करुन नेमकी कोणती वेळ साधली याबाबतही अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, याच खा. स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी एका लेखाची लिंक ट्विटरवर शेअर केली होती. या लेखात शिवसेनेने भाजपसोबत यावे असे म्हटले होते. लेखातील भूमिकेचे समर्थनक करत स्वामी यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकारण संपवतील. त्यामुळे त्यांनी वेळीच सावध होत महाविकासआघाडीतून बाहेर पडत भाजपसोबत यावे असे मत मांडले होते. दरम्यान, त्याच्याच परस्पर उलट भूमिका घेत आता भाजपच शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतो, असे सूचक विधान केले आहे. (हेही वाचा, Coronavirus: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची हीच ती वेळ, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी, काँग्रेसपासून दूर रहावे अन्यथा त्यांचे राजकारण संपेल- सुब्रमण्यम स्वामी)
खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्यास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सरकारला भाजपने पाठिंबा द्यावा. राज्यात स्थिर सरकार आणावं. भाजपने राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर शिवसेनेला पाठिंबा द्यावा. स्वामी यांनी असेही म्हटले आहे की, दोन्ही पक्षांनी शिवसेनेचा पाठिंबा काढल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. त्यापेक्षा राष्ट्रहिताचा विचार करून भाजपाने शिवसेनेला पाठिंबा द्यावा. शिवेसेनाला पाठिंबा देऊन एनडीएचं स्थिर सरकार स्थापन करावं.
If Congi and NCP withdraw support from Uddhav government then in the national interest BJP must extend support and re-form NDA govt in Maharashtra
— Subramanian Swamy (@Swamy39) June 18, 2020
दरम्यान, राज्यत सत्तेवर असलेल्या महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सहभाही आहेत. मात्र, सरकार आणि निर्णय प्रक्रियमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच अधिक वरचष्मा असल्याचे पाहायला मिळते आहे. काँग्रेसला सत्तेत असूनही काही स्थान नाही असे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस नेते नाराज असून त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही कानावर घातली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील एकोपा वाढतो की सत्तासंघर्ष टोकाला जातो याबाबत उत्सुकता आहे.