Monsoon 2022: आता फक्त काहीच तास उरले; पुढच्या दोन दिवसांमध्ये मान्सून कोकणात, उर्वरीत महाराष्ट्रात कधी?
Monsoon | (Photo Credits: Pixabay.com)

Maharashtra Rain Update: उन्हाळा यंदा काहीसा अधिकच जाणवला. उन्हाच्या झळा, घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेली स्थिती नेहमीपेक्षा काहीशी अधिकच वाढली. पण आता काळजी करु नका. यंदा वरुण राजा काहीसा अधिकच प्रसन्न आहे असे दिसते. दरवर्षी 7 जून रोजी महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून (Monsoon 2022) यंदा काहीसा लवकरच आगमन करतो आहे. अर्थात संपूर्ण देशभरातच मान्सून लवकर प्रवेश करतो आहे. केरळमध्येही तो यंदा लवकर आला. आता महाराष्ट्रात तळकोकणातही मान्सून यंदा काहीसा लवकरच दाखल होतो आहे. अपेक्षित आहे की, पुढच्या दोन-ते तीन दिवसांमध्ये म्हणजेच पुढच्या 48 ते 72 तासात तळकोकणात (Tal Kokan,) दाखल होईल. हवामान विभागानेही तसेच सुतोवाच केले आहे..

मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्याचे सांगत हवामान विभागाने म्हटले आहे, यंदा तीन ते चार दिवस आगोदरच मान्सूनचे आमगमन महाराष्ट्रात होईल. यंदा मान्सूनसाठी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर केरळ ते कर्नाटक असा प्रदीर्घ पट्टाच अनुकूल आहे. त्यामुळे पुढच्या दोनच दिवसांत मान्सून गोवा आणि दक्षिण कोकणात दाखल होईल. हाच मान्सून मुंबईत दाखल होईपर्यंत मात्र मुंबईकरांना एक आठवडाभर वाट पाहावी लागेल. मुंबईत मान्सून दाखल होण्यासाठी साधारण 10 जून वैगेरे येईल. (हेही वाचा, Maharashtra Monsoon 2022: पावसाळ्यातील तक्रारींसाठी MSRDC आणि MMRDA ने जारी केले हेल्पलाइन क्रमांक; 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत 24x7 असणार कार्यरत)

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजात यांदा चांगला पाऊस पडेल असे भाकित केले आहे. यंदा जवळपास 106% पर्जन्यवृष्टी होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नेहमीच्या तुलनेत उत्तर-पूर्व भागात पाऊस सामान्यपेक्षा कमी पाहायला मिळू शकतो. हवामान विभागाने 29 मे रोजी जाहीर केल्यानुसार नैऋत्य मान्सून 1 जूनर रोजीच नियोजीत वेळेच्या दोन-तीन दिवस आगोदरच केरळमध्ये दाखल झाला आहे.

हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनीही याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्वटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, कर्नाटकचा आणखी काही भाग,कोकण-गोव्याचा काही भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग,नैऋत्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग,प.म. बंगालचा उपसागर,ई. बंगालचा उपसागर, ईशान्य राज्ये,SHWB,सिक्कीम पुढील 2 दिवसांत जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे'.