ताई तुम्ही पुन्हा लढा आम्ही राजीनामा देतो; पंकजा मुंडे यांच्यासाठी दोन नवनिर्वाचीत आमदारांकडून राजीनाम्याचा प्रस्ताव
Pankaja Munde | (Photo credit : Facebook)

विधानसभा निवडणूक 2019 (Assembly Elections 2019) मध्ये भाजप उमेदवार, माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाला. पारंपरीक प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर पंकजा मुंडे यांचे पुनर्वसण भाजप कसे करणार याबाबत उत्सुकता असतानाच पार्थर्डी मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार मोनिका राजीव राजळे (Monika Rajiv Rajale आणि गंगाखेड येथील राष्ट्रय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुड्डे (Ratnakar Gutte) यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर विशेष प्रस्ताव ठेवला आहे. मोनिका राजळे आणि रत्नाकर गुड्डे या दोन आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवत पंकजा मुंडे यांनी आमच्या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवावी असा प्रस्ताव ठेवला आहे. आता या प्रस्तावाचा स्वत: पंकजा मुंडे स्वीकार करतात का याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसण व्हावे, त्यांना पुन्हा एकदा सरकारमध्ये संधी मिळावी यासाठी मुंडे समर्थकांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. पंकजा मुंडे यांचे पुनर्वसण व्हावे यासाठी आष्टी मतदारसंघातील माजी आमदार भीमराव धोंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पंकजा मुंडे यांचे पुनर्वसण व्हावे, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणने आहे.

रत्नाकर गुड्डे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी तुरुंगातून निवडणूक लढवली आहे. ते निवडूणही आले. गुट्टे यांचे जावई आणि रासपचे युवा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांनी नुकतीच रत्नाकर गुड्डे यांची परभणी येथे भेट घेतली. या वेळी फड यांच्याजवळ गुट्टे यांनी पंकजा यांच्या पराभवाबद्दल खेद व्यक्त केला. तसेच, पंकजा मुंडे यांना पुन्हा विधानसभेवर पाठविण्यासाठी आपण आमदारकीचा राजीनामा देण्यात तयार असल्याचे म्हटले. गुट्टे यांच्या प्रस्तावाची माहिती फड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. (हेही वाचा, महाराष्ट्रात पहिल्यांदाच 24 महिला उमेदवारांचा विजय, पाहा संपूर्ण यादी)

परळी विधानसभा मतदारसंघात या वेळी अत्यंत निकराची लढाई झाली. विधानसभा निवडणूक प्रचारात शेवटचे दोन दिवस तर पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या संघर्षाने व्यक्तिगत टोक गाठले. अनेक आरोप प्रत्यारोप झाले. त्यामुळे या मतदारसंघातूनत कोण बाजी मारणार हे शेवटपर्यंत सांगता येत नव्हते. शेवटी अंतीम निकाल हाती आला तेव्हा धनंजय मंडे विजयी तर, पंकजा मुंडे पराभूत झाल्याचे पाहायला मिळाले.