महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2019) महिला आमदारांनी (Female Candidates) विक्रम केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत 288 जागांपैकी 24 महिला उमेदवारांचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका निवडणुकीत 24 महिला आमदार झाल्या आहेत. यामध्ये ११ विद्यमान आमदार आहेत. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष महिला उमेदारांचाही समावेश आहे. गेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत 2 महिला उमेदवार अधिक निवडून आल्या आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2019 नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत नारी शक्तीचा विजय झाला आहे. 288 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 24 जागांवर महिला उमेदवारांचा विजय झाला आहे. यानंतर विधानसभेत 24 महिला आमदार पहायला मिळणार आहे. यात 11 विद्यमान महिला आमदार आहेत. नुकतीच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 235 महिला उमेदवारांना संधी मिळाली होती. यापैकी 24 महिला आमदारांना विजय मिळवण्यात यश आले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र विधानसभा सत्तेमध्ये समान वाट्यासाठी शिवसेना आमदार आक्रमक; अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाची मागणी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील विजयी महिला आमदार -

भायखळा यामिनी जाधव (शिवसेना)

चोपडा मतदारसंघ- लता सोनवणे (शिवसेना)

बेलापूर मतदारसंघ- मंदा म्हात्रे (भाजप)

दहिसर मतदारसंघ- मनिषा चौधरी (भाजप)

गोरेगाव मतदारसंघ- विद्या ठाकूर (भाजप)

वर्सोवा मतदारसंघ- भारती लव्हेकर (भाजप)

पर्वती मतदारसंघ- माधुरी मिसाळ (भाजप)

कसबापेठ मतदारसंघ- मुक्ता टिळक (भाजप)

नाशिक मध्य मतदारसंघ- देवयानी फरंदे (भाजप)

नाशिक पश्चिम मतदारसंघ- सीमा हिरे (भाजप)

चिखली मतदारसंघ- श्वेता महाले (भाजप)

जिंतूर मतदारसंघ- मेघना बोर्डीकर (भाजप)

केज मतदारसंघ - नमिता मुंदडा- (भाजप)

शेवगाव मतदारसंघ- मोनिका राजळे (भाजप)

धारावी मतदारसंघ- वर्षा गायकवाड (काँग्रेस)

सोलापूर मध्ये मतदारसंघ- प्रणिती शिंदे (काँग्रेस)

वरोरा मतदारसंघ- प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)

अमरावती मतदारसंघ- सुलभा खोडके (काँग्रेस)

तिवसा मतदारसंघ- यशोमती ठाकूर (काँग्रेस)

देवळाली मतदारसंघ- सरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

तासगाव मतदारसंघ- सुमनताई पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

श्रीवर्धन मतदारसंघ- आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

मीरा- भाईंदर मतदारसंघ- गीता जैन (अपक्ष)

साक्री मतदारसंघ- मंजुळा गावित (अपक्ष)

विधानसभेत जाणाऱ्या 24 महिला आमदारांमध्ये 12 महिला आमदार भाजपच्या आहेत. तर काँग्रेसच्या 5, शिवसेनेच्या 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 आणि अपक्ष 2 महिला आमदारांचा यामध्ये समावेश आहे. अशा एकूण 24 महिला आमदार विधासभेमध्ये मतदारसंघातील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. मावळत्या विधानसभेमध्ये 22 महिला आमदार होत्या. त्यामध्ये 2 आमदारांची वाढ झाली आहे.