गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोकणामध्ये गणेशोत्सवाची मोठी धामधूम असते. पण दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणी माणूस चाळण झालेल्या रस्त्यांवरूनच मजल- दरमजल करत गावी पोहचणार असल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने मुंबई- गोवा मार्गाची एक लेन सुरू केली आहे. कशेडी घाटा ऐवजी नवा बोगदा प्रवासासाठी खुला केला आहे. पण त्याचा प्रत्यक्ष किती फायदा होत आहे याचा ग्राऊंड रिपोर्ट मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी समोर आणला आहे. मनसेच्या दाव्यानुसार सरकारने अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. त्यावरूनच पुन्हा आक्रमक होत आज मुंबईत मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरूद्ध नारेबाजी केली आहे.
सायनच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये अभियंता दिना निमित्त एक कार्यक्रम सुरू असताना सभागृहाबाहेर मनसे कार्यकर्ते जमले. त्यांनी आपण रविंद्र चव्हाण यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर पोलिसांनी देखील या कार्यकर्त्यांना तेथून दूर नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी नारेबाजी करणार्या मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रस्त्यांच्या कामात नीट लक्ष न देणार्या अभियंतांचा सत्कार करायची गरज काय? असा सवाल यावेळी मनसेने उपस्थित केला आहे. दरम्यान आज अभियंता दिनाचं औचित्य साधत मंत्री रविंद्र चव्हाण सार्वजनिक विभागातील अभियंतांचा सत्कार करायला षण्मुखानंद हॉल मध्ये पोहचले आहेत. Mumbai-Goa Highway च्या रखडलेल्या कामावरून मनसे होणार आक्रमक; कोकणी माणसालाही दक्ष राहण्याचे आवाहन .
मनसेचा रिपोर्ट
रस्ता अपूर्ण ... तरी अधिकारी आणि अभियंता यांचा सत्कार करण्याची कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून आली असेल ...
मंत्री रवींद्र चव्हाण यांना स्वतःची पाठ थोपटून घ्यायची भारी हौस आहे ...
फक्त बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात.
रस्ता वेळेत पूर्ण करा तुमचा जाहीर सत्कार मनसे करेल... pic.twitter.com/zDdeZ0aUy1
— Gajanan Kale (@MeGajananKale) September 15, 2023
बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल... तुम्ही म्हणाल सणासुदीचा काळ येतोय आणि तुम्ही असं का म्हणताय तर ह्या अशा पोकळ आश्वासनं देणाऱ्या राज्यकर्त्यांना हीच भाषा कळते. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरची एक मार्गिका (Single Lane) सुरु केली अशी आरोळी ठोकणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री… pic.twitter.com/Uqb0zi8jug
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 15, 2023
View this post on Instagram
मुंबई गोवा महामार्ग मागील 17 वर्षांपासून रखडला आहे. काही दिवसांपूर्वी मनसेने यावरून आंदोलन छेडलं होतं. पहिल्यांदा आम्ही शांततेने पदयात्रा काढत सरकारला सूचित करत आहोत. पण पुढे हे आंदोलन आक्रमक होणार असल्याचं मनसेने म्हटलं आहे.