Raj Thackeray | Insta

महाराष्ट्रात दुकानावर पाट्या मराठी भाषेतच असाव्यात असा न्यायालयानेही निकाल दिल्यानंतर आता मुदत उलटल्यावर मनसे (MNS)  आक्रमक झाली आहे. 25 नोव्हेंबर ही पाट्या मराठीत लावण्याची अंतिम तारीख होती. अंधेरी पश्चिम मध्ये मनसे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंधेरी मार्केट मधील दुकानदारांना मराठी भाषेत फलक लावण्याचे आदेश दिले आहेत तर ठाण्यात मराठी पाटी नसलेल्या शोरूमला मनसेने काळे फासले आहे. ठाण्यात मनसेने एमजी मोटर्स (MG Motors) शोरुमला काळे फसले आहे.

दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी दुकानांना मराठी पाट्या असणे आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. कोर्टाने मुदत देऊनही जे मराठीत पाट्या लावणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले आहेत. तर मनसेच्या आंदोलनावर बोलताना त्यांनी जे काळं फासतील त्यांच्याविरोधात केस दाखल करण्यात येईल. असेही स्पष्ट केले आहे. MNS On Marathi Signboards on shops: 'मराठी पाट्या लावा अन्यथा..खळखट्याक' मनसे कार्यकर्त्यांचा बॅनरद्वारे मुंबईतील दुकानदारांना इशारा .

मनसेचा इशारा

मुंबई उच्च न्यायालयाच्या दुकानावरील पाट्या मराठीत करण्याच्या निर्णयाला विरोध करत काही व्यापारी, व्यावसायिक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी कोर्ट कचेरीत पैसा खर्च करण्यापेक्षा मराठी पाट्यांसाठी पैसे खर्च करा असं म्हणत कानउघडणी केली आहे. प्रादेशिक भाषेत पाट्या असाव्यात या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानेही पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी दुकानदारांना पाट्या लावण्यासाठी मुदतही दिली होती.