Mumbai Airport वर गरब्याचा  Flash Mob आणि नंतर  AAHL चं मुख्यालय गुजरात ला हलवल्यानंतर MNS, महाराष्ट्र कॉंग्रेस कडून टीकास्त्र
Mumbai Airport (Photo Credit: PTI)

मुंबई मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Chhatrapati Shivaji Maharaj international Airport Mumbai) चा ताबा आता अदानी ग्रुप कडे गेला आहे. दरम्यान या घडामोडीनंतर सोशल मीडीयामध्ये नुकताच एका गरबा नृत्याचा एअरपोर्ट वरील फ्लॅशमॉब व्हिडिओ देखील वायरल झाला आहे. आणि त्यानंतर यावरून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, मुंबई एअरपोर्टचे सीईओ आर के जैन यांच्याकडे आता विमानतळाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड ने आपलं ऑफिस मुंबई वरून गुजरात अहमदाबादला हलवलं आहे. त्यामुळे मराठी विरूद्ध गुजराती वाद पुन्हा राजकीय पटलावर दिसायला सुरूवात झाली आहे. Mumbai Airport आता Adani ग्रुप कडे; देशातील अन्य 6 आंतरराष्ट्रीय विमानतळांसह अदानी झाले भारतातील सर्वात मोठे एअरपोर्ट ऑपरेटर्स.

मनसे कडून या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना नितीन सरदेसाई यांनी ट्वीट करताना आम्हाला डीवचण्यासाठी 'गरबा' कराल तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल. असं सूचक ट्वीट करत इशारा दिला आहे.

मनसेच्या नितीन सरदेसाई ट्वीट

तर कॉंग्रेस प्रवक्त्यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विमानतळावर झालेलं दांडीया नृत्य बरंच काही सांगून जाते. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्र असेच गुजरातला नेले. मुंबई विमानतळ आधी GVK या आंध्रप्रदेशच्या कंपनीकडे होते. GVK ने मुंबई विमानतळाचे मुख्यालय आंध्रप्रदेशला नेले नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवले नाही. असं म्हणत मोदी सरकार वर हल्ला बोल केला आहे.

कॉंग्रेसच्या सचिन सावंत यांची प्रतिक्रिया

मुंबई एअरपोर्ट वरचा फ्लॅशमॉब

मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाकडे देण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पूर्ण करण्यात आली आहे. आता मुंबई एअरपोर्टच्या व्यवस्थापनाचा एकूण 74 टक्के हिस्सा अदानी समूहाकडे आला आहे. सोबतच अदानी आता भारतातील सर्वात मोठे एअरपोर्ट ऑपरेटर्स झाले आहेत.