Mumbai Airport आता Adani ग्रुप कडे; देशातील अन्य 6 आंतरराष्ट्रीय विमानतळांसह अदानी झाले भारतातील  सर्वात मोठे एअरपोर्ट ऑपरेटर्स
Mumbai Airport (Photo Credit: PTI)

अदानी ग्रुप (Adani Group) ने नुकतीच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai International Airport Limited) ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यासोबतीने नवी मुंबई मध्येही नवं विमानतळ बांधण्याची तयारी पुढील महिन्यापासून सुरू होत असल्याची माहिती एका निवेदनामधून दिली आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात अदानी ग्रुप कडून Mumbai Airport घेणार असल्याबाबत माहिती देण्यात आली आहे. हे विमानतळ पूर्वी GVK Group कडे होते. आता अदानींना हस्तातराणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांच्याकडे MIAL चे 74% असतील.

आता अदानींकडे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आल्याने त्यांच्याकडे 25% पॅसेंजर फूटफॉल्स आणि 33% भारतातील एअर कार्गो असणार आहे. सध्या अदानी ग्रुप हा देशातील सर्वात मोठा Airport Infrastructure Company बनला आहे. सध्याच्या घडीला त्यांच्याकडे 6 एअरपोर्ट्स आहेत.

अदानी ग्रुप कडे मुंबई व्यतिरिक्त असलेले भारतातील एअरपोर्ट्स

  1. राजस्थान मधील जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
  2. तिरुअनंतपुरम मधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ
  3. गुवाहाटी मधील गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ
  4. लखनऊ मधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
  5. अहमदाबाद मधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ
  6. कर्नाटक मधील मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ

    दरम्यान आता मुंबई इंटरनॅशनलचे नवी मुंबईतही होणारे एक्सटेंशन अदानी ग्रुप कडे आहे. या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट चे काम पुढील महिन्यात सुरू होणार आहे. तर फायनांशिअल क्लोजर पुढील 90 दिवसांमध्ये असेल. सध्याच्या माहितीनुसार 2024 पर्यंत हे विमानतळ पूर्ण झालेले असेल. नक्की पहा: Navi Mumbai International Airport चा इथे पहा दिमाखादार अंदाज; GVK ने प्रतिक्षित विमानतळाचा Visionary First Look केला शेअर (Watch Video).

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी शेअर केलेल्या निवेदनामध्ये त्यांनी विमानतळ इको फ्रेंडली  बनवण्याकडे आमचा कल असेल, विमानतळ परिसरात संबंधित व्यवसायांना चालना देण्यासाठी प्रयत्न करणार,  मनोरंजन, ई-कॉमर्स यासारख्या संकल्पनांचा समावेश विकासकामांमध्ये असेल असे म्हटलं आहे.