पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) वतीने महामोर्चा काढण्यात येणाऱ्या आहे. या मोर्चात अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईतील हिंदू जिमखान्यापासून सुरु होणारा हा मोर्चा आझाद मैदानावर येऊन धडकणार आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणाने या मोर्चाची सांगता होणार आहे. त्यामुळे या सांगता सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या भव्य मोर्चासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. मोर्चानंतर होणाऱ्या सभेसाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दक्षिण मुंबईत अप्पर आयुक्तांच्या नेतृत्वाखाली हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच या मोर्चावर सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. (हेही वाचा - जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार नाही, तोपर्यंत दिल्लीवारी नाही- देवेंद्र फडणवीस)
भारत माझा देश आहे! #मनसे_महामोर्चा pic.twitter.com/aUst3XCEJz
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 3, 2020
महत्त्वाची सूचना... 👇 #मनसे_महामोर्चा https://t.co/96p31RZDEA
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 8, 2020
मनसेच्या मोर्चाचा मार्ग गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा असणार आहे. आज दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटी- हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे स्वतः राज ठाकरे मोर्चात सामील असणार आहेत. आझाद मैदानावर 2 लाख लोक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे कृष्णकुंजवरुन मोर्चात सामिल होण्यासाठी निघणार आहेत.