जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार नाही, तोपर्यंत दिल्लीवारी नाही- देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री (Photo Credit : Facebook, Devendra Fadnavis)

महाराष्ट्रात (Maharashtra) महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार आले विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. यातच विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही शिवसंग्राम फाऊंडेशन डे निमित्त आयोजित मेळाव्यात ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे सरकार हे विश्वासघातकी सरकार आहे. हे फार काळ टीकणार नाही. तसेच जोपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार नाही तोपर्यंत मी महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही असे फडणवीस यांनी म्हटले आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जात असल्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी तिन्ही पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. भाजप आणि शिवसेने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकत्र लढवली असून या निवडणुकीत जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, मुख्यमंत्री पदावरून महायुतीत वाद निर्माण झाला होता. त्यांनंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करत महाराष्ट्राला नवे सरकार दिले होते. तेव्हापासून भाजपने आपली कंबर कसली असून वारंवार सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. यातच देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीकास्त्र सोडले आहे. मी मैदान सोडून पळणाऱ्यातला नाही असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जात असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. जोपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येणार नाही तोपर्यंत मी महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही. आम्ही बदल्याच्या भावनेने कधीही वागलो नाही. मात्र हे सरकार प्रगती नाही तर स्थगिती सरकार आहे असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार आल्याशिवाय दिल्लीवारी नाही असेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- मनसे कार्यकर्त्यांकडून मोर्चाची जय्यत तयारी; राज्यभरातून 2 लाख समर्थक मुंबई येथील आझाद मैदानात दाखल होण्याची शक्यता

जनतेने तर आपल्याला मत दिली, जनतेने आपल्याला जागा दिल्या. हे तर यांनी राजकीय गणित बिघडवली आणि राजकीय हाराकिरी करुन आपले सरकार होऊ दिले नाही. हे जे सरकार येथे काम करत आहेत, हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही. जनतेने निवडून दिलेले सरकार तर भाजपचे होते. जनतेने भाजपसह युतीला जनतेने बहुमत दिले होते. मात्र, यांनी राजकीय हाराकिरी करुन सरकार बनवले. हे फार काळ टिकणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.