कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गेल्या चार महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) लॉकडाऊन आहे. परिणामी, उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी बंद आहेत. मात्र, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या अनेक निर्बंधांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. परंतु, अद्यापही राज्यातील धार्मिक स्थळ बंदच आहेत. याचपार्श्वभूमीर त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचे एका शिष्टमंडळाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंज येथील निवासस्थानी भेट घेतली. यावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. दरम्यान. जर खबरदारी घेऊन महाराष्ट्रातले मॉल्स उघडू शकतात तर मंदिर का उघडली जात नाहीत? असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
महाराष्ट्रातील मंदिर हे लॉकडाउन जाहीर झाल्यापासून बंद आहेत. म्हणजेच मार्च महिन्यापासून ही मंदिर बंद आहेत. कोणतीही गर्दीही होऊ नये आणि करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय सरकारने घेतला. मात्र आता ऑगस्ट महिना उजाडला आहे. अशात हळूहळू अनलॉकच्या दिशेने आपण जातो आहोत. असे सगळे असताना मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे? योग्य खबरदारी घेऊन जर मॉल्स उघडले जाऊ शकतात, दुकान उघडली जाऊ शकतात तर मंदिर का उघडण्यात येत नाहीत? असे प्रश्न राज ठाकरे यांनी विचारले आहेत. हे देखील वाचा- दरवर्षी मंत्रिमंडळाची एक बैठक रायगड किल्ल्यावर घ्यावी; छत्रपती संभाजीराजे यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विनंती
ट्वीट-
"धार्मिक स्थळं उघडायला हवीत परंतु धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? त्याची एक नियमावली ठरवावी लागेल, मी सरकारशी बोलतो. कारण मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?" - मनसे अध्यक्ष @RajThackeray #महाराष्ट्रधर्म pic.twitter.com/kKekFU6mrx
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 17, 2020
तसेच राज ठाकरे यांनाही काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. कोरोना संकटात तुम्ही कशाप्रकारे मंदिर सुरु करणार? याची नियमावली तयार करा. मंदिरात अचानक झुंबड आली तर काय करणार? यासंदर्भात नियमावली तयार करा. ही नियमावली आपण राज्य सरकारकडे सुपूर्द करू, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी त्र्यंम्बक पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, संतोष धुरी उपस्थित होते.