महाराष्ट्रात कोरोना संकटामुळे शिक्षण व्यवस्थेचे तीन - तेरा वाजले आहेत. दरम्यान ऑक्टोबर महिन्यात यंदा सीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते मात्र अतिवृष्टी, वीजपुरवठा खंडित होणं आणि इतर काही नैसर्गिक संकटाच्या मार्यामुळे काही विद्यार्थी सीईटी परीक्षेपासून दूर राहिले होते. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी यंदा एमएच सीईटी परीक्षांचे (MHT CET Exam 2020) पुन्हा एकदा आयोजन करण्यात आले आहे. 7 नोव्हेंबरला यापूर्वीची सीईटी परीक्षा देण्याची संधी हुकलेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान याकरिता 4188 जणांनी नोंदणी केली असून राज्यात 45 केंद्रांवर परीक्षा घेण्यासाठी मंडळ सज्ज झालं आहे.
एमएच सीईटीच्या परिईक्षा यंदा 1 ते 9 आणि 12 ते 20 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र या काळातच काही आपत्कालीन संकटांमुळे काहींची परीक्षा देण्याची संधी हुकली होती. त्यांना आता नव्या वेळापत्रकानुसार, 7 नोव्हेंबरला सकाळी 9-12 या वेळेत पीसीबी ग्रुपची तर दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत पीसीएम ग्रुपची सीईटी परीक्षा देता येणार आहे. या परीक्षेचं वेळापत्रक, अॅडमिड कार्ड ऑनलाईन जारी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना mhcet2020.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अॅडमीट कार्ड मिळणार आहे. इथे पहा नोटिफिकेशन.
MAH CET 2020 Admit Cards ही PCM,PCB ग्रुप साठी कशी डाऊनलोड कराल?
- mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- होम पेजवर candidate’s login section निवडा.
- तुमच्या लॉगिनसाठी विचारलेली आवश्यक माहिती भरा. आणि proceed वर क्लिक करा.
- “Download hall tickets” हा पर्याय तुमच्यासमोर दिसेल.
- विषयांमध्ये PCB,PCM ग्रुप निवडा आणि सर्च वर क्लिक करा.
- तुमच्या विषयांच्या ग्रुप नुसार अॅडमीट कार्ड समोर येतील.
- स्क्रिनवरील अॅडमीट कार्ड तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता
दरम्यान परीक्षा केंद्राचं नाव, पत्ता, वेळ, तारीख याची नोंद विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर म्हणजेच अॅडमीट कार्डवर असेल. परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे हे प्रवेशपत्र असणं आवश्यक आहे.