Exam Result| Pexel.com

महाराष्ट्र सीईटी सेल कडून Maharashtra Health and Technical Common Entrance Test अर्थात  MHT CET 2025 साठी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 16 मार्च 2025 पासून या परीक्षा सुरू होणार असून 24 एप्रिल 2025 पर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहेत. विद्यार्थ्यांना सीईटी कडून घेतल्या जाणार्‍या परीक्षेचं वेळापत्रक अधिकृत वेबसाईट वर अपलोड करण्यात आलं आहे. cetcell.mahacet.org वर विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक पाहता येणार आहे. 12वी नंतर प्रोफेशनल कोर्सच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देणं आवश्यक आहे. बारावीचे गुण आणि या प्रवेश परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात कॉलेज मध्ये अ‍ॅडमिशन दिले जाते. Maharashtra Board Exam Time Table 2025: महाराष्ट्र शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केले 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2025 चे वेळापत्रक; जाणून घ्या तारखा .

कसं पहाल MHT CET 2025 वेळापत्रक?

    • cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा.
    • होमपेज वर MHT CET 2025 tentative schedule पहा.
    • आता वेळापत्रक पाहण्यासाठी पीडीएफ फाईल ओपन करा.
    • हे वेळापत्रक डाऊनलोड करून तुमच्यासाठी सेव्ह देखील करू शकता.

MAH-MHT CET (PCB Group) CET 2025 परीक्षा ही 9 आणि 17 एप्रिल दरम्यान तर MAH-MHT CET (PCM Group) CET 2025 ही 19 आणि 27 एप्रिल दरम्यान होणार आहे. सीईटी सेल कडून M.Ed, MBA, LLB च्या परीक्षा तारखा देखील जारी करण्यात आल्या आहेत.