MHADA Pune Lottery 2021 Result Live Streaming: पुणे विभागातील म्हाडाच्या घरांचा ऑनलाईन निकाल घरबसल्या इथे पहा!
Mhada Fraud Warning | (Photo credit: archived, edited, representative image)

पुणे विभाग गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात म्हाडाच्या (MHADA Pune Division)  पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्हांत 5647 घरांसाठी आज (22 जानेवारी) नेहरू मेमोरियल सभागृह मध्ये ऑनलाइन लॉटरी जाहीर होणार आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज नागरिकांना नेहरू मेमोरियल मध्ये गर्दी न करता लाईव्ह वेब कास्टिंग द्वारा सोडत पहावी असं आवाहन करण्यात आले अअहे. सकाळी 9 च्या सुमारास उद्घाटन कार्यक्रमाला सुरूवात तर नंतर 10.30 पासून सोडत जाहीर करण्यास सुरूवात होणार आहे. नक्की वाचा : Pune MHADA Lottery 2021 Result: म्हाडाच्या पुणे विभागातील 5647 घरांसाठी 22 जानेवारीला जाहीर होणारा निकाल कुठे, कधी, कसा बघाल?

दरम्यान म्हाडाच्या पुणे विभागातील भाग्यवान विजेत्यांची संपूर्ण यादी आज संध्याकाळी 6 नंतर म्हाडाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार आहे. तसेच ज्यांना घर लागले आहे अशांना एसएमएस पाठवले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही देखील यासाठी अर्ज दाखल केला असेल आज्चा म्हाडाचा घरांसाठीचा ऑनलाईन निकाल घरबसल्या पाहण्यासाठी खालील युट्युब लिंकला नक्की भेट द्या.

पुणे म्हाडा घरांच्या लॉटरीचा निकाल 2021

नेहरू मेमोरियल सभागृहामध्ये आज पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. तसेच जितेंद्र आव्हाड, नीलम गोर्‍हे या देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील. यंदा कोविड संकटकाळात म्हाडाची लॉटरी जाहीर झाली असली तरीही नागरिकांना त्याला तुफान प्रतिसाद दिला आहे. 5647 घरांसाठी 90 हजाराहून अधिक अर्ज आले आहेत.