MHADA | Photo Credits: File Photo

म्हाडाच्या पुणे विभागाच्या (Mhada houses  Pune division) 5647 घरांसाठी उद्या(22 जानेवारी) दिवशी सोडत जाहीर केली जाणार आहे. यामध्ये अनेकांची पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील घरांचा समावेश आहे. दरम्यान यंदा देखील ही लॉटरी सोडत अर्जदारांना ऑनलाईन पाहता येणार आहे. नेहरू मेमोरियल हॉल ( Nehru Memorial hall) मध्ये या म्हाडा घरांच्या लॉटरीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी अधिकाधिक अर्जदारांनी त्याच वेबकास्टिंग पहावं असं आवाहन करण्यात आले आहे. भाग्यवान विजेत्यांना घरबसल्या निकाल पाहण्याची सोय यंदा देखील उपलब्ध असेल. सोबतच ज्यांना या सोडतीमध्ये घर लागणार आहे त्यांना ई मेल, एसएमएस या द्वारा माहिती मिळणार आहे. MHADA Mumbai Lottery 2021: म्हाडाची पुढील वर्षात मुंबईतील घरांसाठी मेगा लॉटरी, जाणून घ्या अधिक.

म्हाडा लॉटरी उद्घाटन समारंभ 22 जानेवारीला सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून ऑनलाइन लॉटरी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावरही निकाल पाहण्याची सुविधा असणार आहे. त्यामुळेच नागरिकांनी कोरोना संकटाचं भान ठेवत यंदा ऑफलाईन निकालाच्या ठिकाणी गर्दी करण्याऐवजी ऑनलाईन निकाल पहावा असं आवाहन करण्यात आले आहे.

निकाल कुठे पहाल?

म्हाडा लॉटरीचा पुणे विभागातील निकाल http://bit.ly/PuneLottery2021 या युट्युब लिंकवर तुम्हांला ऑनलाईन वेबकास्टींग पाहता येणार आहे. तर lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उद्या सायंकाळी सहा वाजल्यानंतर निकालाची संपूर्ण यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जाहीर करण्यात आलेल्या लॉटरी मध्ये यंदा 90 हजार अर्ज आले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये 5217 घरं आहेत. पंतप्रधान आवास योजना, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, ‘म्हाडा’कडून बांधण्यात आलेले प्रकल्प आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत ही घरं नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.