MHADA | Photo Credits: File Photo

MHADA Mumbai Lottery 2021:  महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) कडून मुंबईकरांना नव्या वर्षात गिफ्ट देण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे, म्हाडाने 2021 मध्ये 2500 घरांसाठी मेगा लॉटरी काढण्यासाठी काम सुरु केले आहे. लॉटरीमध्ये गोरेगाव येथे उभारण्यात येणाऱ्या घरांसह विविध प्रोजेक्ट मधील अनअलॉटेड घरांचा सुद्धा समावेश केला जाणार आहे. म्हाडाच्या या योजनेनंतर मुंबईत आपले घर असावे असे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी असणार आहे.(MHADA Pune Board Lottery 2020: पुण्यात म्हाडाच्या 5647 घरांसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला lottery.mhada.gov.in वर सुरूवात; इथे पहा महत्त्वाच्या तारखा)

गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा म्हाडाच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकरत अनअलॉटेड घरांची सुची तयार करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे 2021 च्या सुरुवातीलाच लोकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. म्हाडाकडून आगामी वर्षात मुंहईत जवळजवळ 25 हजार घर उभारणीची योजना तयार केली आहे. यामध्ये 7003 पहाडी गोरेगाव आणि मोतीलाल नगरमध्ये 18 हजार घरे बांधली जाणार आहेत. शिखाला परवडणाऱ्या किंमतीच्या घरांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हाडाने 1,945,45 कोटी रुपयांची योजना तयार केली आहे. लोकांना स्वस्तत घर देण्यासह प्राधिकरणाने 25,000 कोटी रुपये मिळविण्याचा मार्गही शोधला आहे.(विक्रोळी-कांजूरमार्ग परिसरात घरासाठी फुकट जागा मिळत असल्याची पसरली अफवा आणि मग जे झाले ते ऐकून तुम्हीही माराल डोक्यावर हात)

गोरेगाव मोतीलाल नगर मध्ये 143 एकर जमीनीवर 5000 कोटी रुपयांच्या योजनेवर काम केले जात आहे. जेथे पुनर्वसनासाठी 3700 घरांची उभारणी केल्यानंतर म्हाडाला विक्रीसाठी 18 हजार घरे मिळणार आहेत. 7003 घरांची उभारणी ही पहाडी गोरेगाव येथे असणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1947 तयार केले जाणार आहेत. ईडब्लूएसचे सर्वाधिक 2000 घर आणि एमआयजीचे 768 घर, एलआयजीची 1600 घर आणि एचआयजीची 792 घर उभारली जाणार आहेत. मुंबई म्हाडा बोर्डाचे चीफ ऑफिसर योगेश म्हसे यांनी असे म्हटले की, गोरेगाव मध्ये 7 हजार घरांची बांधणी केली जात आहे.