(Photo Credits File)

MHADA Mumbai Lottery Results 2024 On housing.mhada.gov.in: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबई मंडळ आज, मंगळवार, 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता 2030 घरांसाठी लकी ड्रॉ जाहीर करणार आहे. मुंबईत राहणारे लोक म्हाडाचे घर घेण्याचे स्वप्न पाहतात. म्हाडाचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्यांनी या मोठ्या घरांसाठी अर्ज केले आहेत ते म्हाडा बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट housing.mhada.gov.in ला भेट देऊन त्यांच्या नावांची यादी बोर्डाने लकी ड्रॉ जाहीर केल्यानंतर पाहू शकतात. हे देखील वाचा: Jammu and Kashmir, Haryana Assembly Elections Results 2024: जम्मू-कश्मीर मध्ये कोणाचे सरकार? हरियाणा पुन्हा BJP की काँग्रेसला संधी? आज फैसला

housing.mhada.gov.in वर निकाल कसा तपासायचा:

लकी ड्रॉ घोषित झाल्यानंतर, तुम्हाला सर्वप्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, housing.mhada.gov.in वर जावे लागेल. यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांकासह इतर माहिती द्यावी लागेल. अर्जदाराला हवे असल्यास, तो म्हाडा बोर्डाच्या अधिकृत ॲपला भेट देऊन लकी ड्रॉ देखील पाहू शकतो.

इतर तपशील

श्रेणी

मुंबई, नागपूर, पुणे येथील वार्षिक कुटुंब उत्पन्न स्लॅब

उर्वरित महाराष्ट्रातील वार्षिक कुटुंब उत्पन्न स्लॅब

कार्पेट एरिया

आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (EWS)

Rs 6 lakh Rs 4.5 lakh 30 sqm

कमी उत्पन्न गट (LIG)

Rs 9 lakh Rs 7.5 lakh 60 sqm

मध्यम उत्पन्न गट (MIG)

Rs 12 lakh Rs 12 lakh 160 sqm

उच्च उत्पन्न गट (HIG)

above Rs 12 lakh above Rs 12 lakh 200 sqm

म्हाडाला १,३४,३५० अर्ज प्राप्त झाले: 

म्हादमुंबई मंडळ मंडळाकडे यावर्षी 2,030 घरांसाठी 134,350 अर्ज आले आहेत. ज्यामध्ये 1,13,811 अर्जदारांनी सुरक्षा रक्कम भरली आहे. ज्या घरांचा लकी ड्रॉ म्हाडाकडून जाहीर केला जाईल. लकी ड्रॉ यापूर्वी १३ सप्टेंबर रोजी जाहीर होणार होता. लॉटरी निघाल्यानंतर विजेत्यांना पैसे भरून घरांचा ताबा मिळू शकतो. 9 ऑगस्टपासून 2030 घरांसाठी लॉटरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. याआधी लॉटरीचा निकाल 13 सप्टेंबरला लागणार होता, मात्र लॉटरीला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर म्हाडाने घरांच्या किमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी केल्या होत्या. त्यानंतर लकी ड्रॉची तारीख 8 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली.

या भागात ही घरे बांधली

म्हाडा मुंबई मंडळ 2030 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. ती घरे मुंबईतील हिली गोरेगाव, अँटॉप हिल - वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर - विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स - मालाड येथे आहेत.

डिपॉझिट भरताच तुम्हाला मिळेल ताबा 

 लकी ड्रॉ जाहीर झाल्यानंतर अनामत रक्कम भरल्यानंतर म्हाडाकडून ताबाही मिळण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजेच, लकी ड्रॉ जाहीर झाल्यानंतर अर्जदारांनी लवकरात लवकर डिपॉझिटची रक्कम भरली, तर ते त्यांच्या नवीन घरात दिवाळी साजरी करू शकतात.