MHADA Lottery Konkan Board 2021 Result: म्हाडा च्या कोकण मंडळाच्या 8,984 घरांची लॉटरी आज होणार जाहीर; mhada.ucast.in वर पहा लाईव्ह टेलिकास्ट
म्हाडा (Photo Credits-Facebook)

म्हाडा (MHADA) कडून आज कोकण मंडळाच्या (Konkan Board) 8,984 घरांची लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे. ही सोडत ठाण्याच्या डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात (Dr. Kashinath Ghanekar Natyagruha) पार पडणार आहे. तर अर्जदारांना हा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी खास लाईव्ह स्ट्रिमिंगची सोय करण्यात आली आहे. दरम्यान कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 6195 घरं, अल्प उत्पन्न गटासाठी 1775, मध्यम उत्पन्न गटासाठी 234 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 1 अशी एकूण 8205 घरांचा समावेश आहे. आणि 700 उरलेल्या घरांचा समावेश असणार आहे.

मागील 2-3 वर्षांपासून म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून तर 3 वर्षांपासून कोकण मंडळाकडून कोणतीही सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. या भागात अनेकांनाच आपलं स्वप्नातलं घर असावं अशी इच्छा असल्याने अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तसाच प्रतिसाद यंदा देखील मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यापासून यासाठी अर्ज मागवण्यात आले होते तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्ज सादर करण्यासोबत इतर गोष्टींना देखील मुदतवाढ देण्यात आली होती.नक्की वाचा:  Mahad, Raigad Landslide: दरड कोसळून उद्धवस्त झालेलं तळीये गाव म्हाडा वसवणार; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा.

म्हाडा कोकण मंडळ सोडत

कुठे पहाल ऑनलाईन निकाल - http://mhada.ucast.in/

वेळ - सकाळी 10 वाजल्यापासून

दरम्यान आज जाहीर होणार्‍या सोडतीमध्ये मीरा रोड, विरार, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. 8984 घरांसाठी 2,46,650 इतके रेकॉर्डब्रेक अर्ज दाखल झाले आहेत. आजच्या या लॉटरीमध्ये ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, मंत्री एकनाथ शिंदे, सतेज पाटील, कपिल पाटील, विनोद घोसाळकर आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोडत ठिकाण अर्थात डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मर्यादित उपस्थितांनाच प्रवेश दिला जाणार आहे. म्हाडा कडून करण्यात आलेल्या आवाहनानुसर, सोडत जाहीर होणार्‍या ठिकाणी लोकांनी गर्दी न करत लाईव्ह स्ट्रिमिंग द्वारा निकाल पहावा. तसेच सविस्तर निकाल, भाग्यवान विजेत्यांची यादी,प्रतिक्षितांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही तासांत अपडेट केली जाणार आहे. भाग्यवान विजेत्यांना एसएमएस द्वारा देखील निकाल कळवला जातो.