Controversial Statement of Dilip Walse Patil: विवाह टिकवण्यासाठी पुरुषांनी बाहेर राहावे आणि महिलांनी घरातील कामे करावीत; महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे यांचे वादग्रस्त विधान
Dilip Walse Patil | (Photo Credits: Facebook)

Controversial Statement of Dilip Walse Patil: महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची एक वादग्रस्त टिप्पणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे की, विवाह टिकवण्यासाठी आणि घरगुती हिंसाचार टाळण्यासाठी पुरुषांनी बाहेर राहावे आणि महिलांनी घरातील कामे करावीत. याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना राजकारण कळत नाही, घरी जाऊन स्वयंपाक करा, अशी टिप्पणी केली होती.

दिलीप वळसे पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सार्वजनिक कार्यक्रमात समर्थकांना संबोधित करताना त्यांनी महिलांवर वादग्रस्त विधाने केली आहेत. या व्हिडिओमध्ये दिलीप वळसे पाटील म्हणत आहेत की, "चांगल्या लग्नासाठी आणि घरगुती हिंसाचार टाळण्यासाठी पुरुषांनी घराबाहेर राहावे आणि महिलांनी घरातील कामे करावीत." हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Sanjay Raut On Modi Government: ED आणि CBI च्या कारवाईवर शिवसेना संतप्त; संजय राऊत म्हणाले, 'ना महाराष्ट्र झुकणार, ना शिवसेना घाबरणार')

याआधी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. तुम्हाला राजकारण कळत नाही, म्हणून घरी जाऊन स्वयंपाक करा, असे ते म्हणाले होते. मात्र, सुळे यांनी गावोगावी जाऊन राजकारण शिकावे, समजून घेण्याचा प्रयत्न करावा, असा त्यांचा अर्थ होता, असे चंद्रकांत पाटील यांनी या वक्तव्यावरून घेरल्यानंतर स्पष्ट केले होते.