Mumbai Local | Representational Image | (Photo Credits: PTI)

रेल्वेच्या तांत्रिक कामांसाठी  आज 9 जून ला  मध्य (Central Railway)  हार्बर (Harbour Railway) व पश्चिम रेल्वे (Western Railway) या तीन ही मार्गांवर मेगाब्लॉक (Megablock )  घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण-अंबरनाथ मार्गावर तर हार्बर रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून ते चुनाभट्टी वांद्रे मार्गावर आज दिवसा ब्लॉक घेण्यात येईल. सोबतच पश्चिम रेल्वे मार्गावर देखील सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे.  मध्य रेल्वेवर काल मध्यरात्री दुरुस्तीचे कामे पार पडली असल्याने आजकल्याण ते सीएसएमटी दरम्यान दिवसभरात ब्लॉक नसेल, यामुळे प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे.

9  जून मेगाब्लॉक वेळापत्रक

मध्य रेल्वे

कल्याण ते अंबरनाथ अप व डाऊन मार्गावर सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 4 पर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉकच्या वेळेत कल्याण ते बदलापूर दरम्यानच्या लोकल फेऱ्या रद्द राहतील, तर बदलापूर ते कर्जत अशा विशेष लोकल गाड्या सोडण्यात येणार आहेत.

हार्बर मार्ग

सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दरम्यान 9  जून ला अप मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40  पर्यंत आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.40  ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक असणार आहे.

पश्चिम रेल्वे

सांताक्रुझ ते गोरेगाव या पाचव्या मार्गिकेवर  रविवारी दिवसा ब्लॉक ठेवण्यात आला आहे. सकाळी 10.35  पासून ते दुपारी 3.35 पर्यंत ब्लॉक रेलेवं रुळांचे काम करण्यात येईल. ब्लॉक दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर सर्वसाधारण वाहतूक ही काहीश्या उशिराने होणार आहे.

एक्सप्रेस गाड्यांचे बदल

ब्लॉक दरम्यान तीन मार्गांवरील काही एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई ते पुणे ते मुंबई सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस आणि पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली आहे.तसेच काकीनाडा पोर्ट-एलटीटी-काकीनाडा एक्स्प्रेस, सीएसएमटी ते नागरकोईल एक्स्प्रेस, हैदराबाद ते सीएसएमटी ते हैदराबाद एक्स्प्रेस, चेन्नई सेन्ट्रल-सीएसएमटी-चेन्नई सेन्ट्रल एक्स्प्रेस, कोल्हापूर-सीएसएमटी सह्य़ाद्री एक्स्प्रेस, कोईंबतूर ते एलटीटी एक्स्प्रेस दिवा-पनवेल-कर्जतमार्गे चालवण्यात येतील. IRCTC Special Tourist Train: भारत दर्शन - केवळ 9,900 रुपयांत फिरा देशभर, IRCTC ची पर्यटकांसाठी स्पेशल ऑफर

 

आज  दिवसा घेण्यात येणार मेगाब्लॉक मध्ये रेल्वे रुळांची उंची वाढवणे यासह अन्य काही तांत्रिक कामांचा समावेश असणार आहे.