मुंबईच्या लोकल (Mumbai Local) रेल्वे मार्गावरील तांत्रिक कामांसाठी दर रविवार प्रमाणे उद्या म्हणजेच 6 ऑक्टोबर रोजी मेगाब्लॉकचे (Megablock) आयोजन करण्यात आले आहे. यानुसार मध्य रेल्वे (Central Railway), पश्चिम रेल्वे (Western Railway) तसेच हार्बर (Harbour Railway)- ट्रान्स हार्बर (Trans Harbour) मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेने याबाबत ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. मध्य मार्गावर उद्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन मार्गावरील धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर पनवेल वाशी अप व डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे ने सुद्धा उद्या तीन तासांच्या जम्बो ब्लॉकचे नियोजन केले आहे. उद्या ब्लॉक च्या निमित्ताने ट्रान्सहार्बर मार्गावर सुद्धा तांत्रिक कामे पार पडणार आहेत.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वे वर माटुंगा ते मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर साक्ली 11.20 पासून ते दुपारी 3.50 पर्यंत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत धीम्या मार्गावरील गाड्या या जलद मार्गावर फिरवण्यात येतील तर विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकात गाड्या थांबणार नाहीत. या प्रवाशांना एकाच तिकिटावर घाटकोपर, भांडुप, मुलुंड येथून प्रवास करता येणार आहे. सर्व लोकलच्या फेऱ्या या साधारण 15 ते 20 मिनिटे उशिराने असणार आहेत.
हार्बर रेल्वे
उद्या सकाळी 11.30 ते सुपारी 4 दरम्यान पनवेल- वाशी अप तसेच डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी सीएसएमटी वरून बेलापूर व पनवेल येथे जाणाऱ्या तसेच अप मार्गावरून सीएसएमटी कडे येणाऱ्या लोकल फेऱ्या बंद ठेवण्यात येणार आहेत, तसेच पनवेल - अंधेरी लोकल देखील बंद असतील. प्रवाहांच्या सोयीसाठी सीएसएमटी - वाशी ही विशेष लोकल चालवण्यात येणार आहे.
ट्रान्स हार्बर रेल्वे
ट्रान्स हार्बर अप व डाऊन मार्गावरील ठाणे ते पनवेल या स्थानकांच्या दरम्यान उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी पनवेल- ठाणे अप डाऊन फेऱ्या बंद असतील. मात्र ठाणे- वाशी- नेरुळ दरम्यान लोकलसेवा सुरु असणार आहे
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री 3 ते पहाटे 4 च्या दरम्यान वसई रोड ते भाईंदर स्थानकाच्या मध्ये ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉकच्या कालावधीत सर्व मार्गांवर काही लोकल फेऱ्या बंद ठेवण्यात येणार आहेत तर काही ठिकाणी लोकल 15 ते 20 मिनिटे उशिरानं धावणार आहेत. या वेळी प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी संपूर्ण वेळापत्रक पाहून मगच प्रवासाचे प्लॅनिंग करावे.