Local Mega Block: रेल्वेचा तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच नागरिकांनी घराबाहेर पडावे
Mumbai Local Train | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. आज रविवार असल्यामुळे लोकलने प्रवास (Mumbai Local) करणाऱ्यांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच लोकलचा प्रवास करावा. आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक (Mumbai Local Megablock) घेण्यात आला आहे. या काराळात उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. अन्यथा प्रवास करताना नागरिकांना त्रास होऊ शकतो. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी- विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावरील सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर तर पश्चिम रेल्वेच्या माहीम ते गोरेगाव अप- डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. (हेही वाचा:Konkan Railway Monsoon Time Table 2024: कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक! 10 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान मान्सून स्पेशल वेळापत्रकानुसार धावणार ट्रेन )

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक 

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 वाजेपर्यंत सीएसएमटी ते विद्याविहार अप - डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील धीम्या लोकल डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. यादरम्यान लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे डाऊन धीम्या मार्गावर मार्गावर वळविण्यात येणार आहेत. घाटकोपरवरून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकलसेवा विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक 

पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी 1 ते दुपारी 4 वाजेपर्यंत माहीम ते गोरेगाव अप - डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते वांद्रे आणि सीएसएमटी ते गोरेगाव हार्बर मार्गावरील लोकलसेवा आणि काही चर्चगेट- गोरेगाव धीमी अप- डाऊन लोकलसेवा रद्द असणार आहे.

हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.40वाजेपर्यंत सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणा आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी /वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहतील. तर सीएसएमटी येथून येथून वांद्रे/गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहतील. तर, पनवेल/ बेलापूर/ वाशी येथून सीएसएमटीकरीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील लोकलसेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.