सध्या देशातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. अशामध्ये मराठी सिनेसृष्टीचे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. '2024 मध्ये पुन्हा भाजपच येणार असून नरेंद्र मोदीच पंतप्रधान (PM Narendra Modi) होणार', असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 350 ते 375 जागा मिळतील. देशामध्ये भाजपाशिवाय पर्याय नाही. भाजपकडून ऐवढं चांगलं काम चालले आहे. नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.' (हेही वाचा - Nana Patekar On Viral Video: सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याला थप्पड मारल्याप्ररकणी नाना पाटेकर यांनी दिली प्रतिक्रिया)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांचा या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यामुळे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

अभिनेते नाना पाटेकर लवकरच 'ओले आले' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ते या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि मकरंद अनासपुरे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.