Eknath Shinde | (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्रात आज (27 फेब्रुवारी) मराठी राजभाषा दिन (Marathi Rajbhasha Din) साजरा केला जात आहे. ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज (Kusumagraj) यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. आता मराठी भाषिकांना वेध लागले आहेत ते म्हणजे आपल्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा (Elite Class) मिळावा याचे. आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्येही हा मुद्दा उचलण्यात आला. एनसीपी नेते छ्गन भुजबळ यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने मिळावा अशी मागणी करण्यात आली त्यावेळी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच राज्याचं एक शिष्टमंडळ भेटणार असून त्यांच्याकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत विनंती केली जाईल' अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे.

मागील अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून विविध स्तरातून प्रयत्न करण्यात आले आहेत. राष्ट्रपती भवनामध्येही त्यासाठी करोडो मराठी बांधवांची पत्र देण्यात आली आहे. त्यासाठी विशेष मोहिम देखील राबवली होती. नक्की वाचा: Marathi Rajbhasha Din 2023: मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देत राज ठाकरेंचं मराठी बांधवांना साद; 'अभिजात भाषेचा' दर्जा मिळावा यासाठी मनसेला साथ द्या .

मराठी भाषा बोलीभाषेपुरती मर्यादित न राहता ज्ञानभाषा आणि अभिजात भाषेचा दर्जा व्हावा याकरता 100 टक्के समर्थन असल्याची माहिती भाजपा आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे. राज्याचं विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर मार्च, एप्रिल महिन्यात कोणतीही परदेशी ट्रीप होण्याआधी सर्वांनी दिल्लीत जाऊन अभिजात भाषेसाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती आशिष शेलार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी बोलताना केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.

भारत सरकार कडून आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.