Gunaratna Sadavarte and Manoj Jarange | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Maratha Reservation News: गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना तत्काळ अटक करावी, त्यांना मुसक्या बांधाव्यात आणि कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांवरील हल्ल्यापासून सुरु झालेली अघटीत घटनांची मालिका सुरु झाली. जी आता माझ्या घरापर्यंत येऊन ठेपली आहे. त्यामुळे मला जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांनाही हे सांगायचे आहे की, आता बस्स झालं. ज्या व्यक्तीमुळे पोलीस धाराधिर्ती पडले त्यांना अटक व्हायलाच हवी. सदावर्ते यांच्या वाहनाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सदावर्ते यांनी ही भावना व्यक्त केली. दरम्यान, सदावर्ते यांनी वाहनाची तोडफोड केल्याच्या घटनेत मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित कार्यकर्त्यांवर संशय व्यक्त केला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलकांवर गंभीर आरोप केले आहेत. विशेषत: मनोज जरंगे यांना यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. सदावर्ते यांनी म्हटले आहे की, तुमच्या शांततापूर्ण निषेधाची ही व्याख्या आहे का? मला गप्प बसवता येणार नाही. खुल्या वर्गासाठी नियुक्त केलेल्या 50 टक्के जागा अबाधित राहतील याची खात्री करण्यासाठी मी अथक प्रयत्न करत आहे. आंदोलकच माझे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते होणार नाही. तुम्ही माझ्यावर हल्लाच केला नाही तर माझ्या कुटुंबालाही धमकावले आहे. माझी मुलगी तिच्या जीवाला आणि माझ्या पत्नीच्या सुरक्षेला धोका असल्याने आठ दिवसांपासून शाळेत जात नाही, असेही सदावर्ते यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सदावर्ते यांनी पुढे म्हटले की, मी मागे हटणार नाही. या क्षणापासून मी राज्यभरातील महाविद्यालयांना भेट देईन आणि गुणवंत विद्यार्थ्यांशी खुला संवाद साधेन. मी सरकारला सांगेन की त्यांनी आमची भूमिका ऐकण्याची गरज आहे. जरंगे यांचा पक्षपातीपणा कायम राहिला तर मी उपोषण सुरू करणार आहे,' असे सदावर्ते यांनी जाहीर केले.

परळ येथील सदावर्ते यांच्या निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या वाहनाची तीन अज्ञात व्यक्तींनी सकाळी साडेसहा वाजणेच्या सुमारास तोडफोड केली. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कारच्या तोडफोडीत सहभागी असलेले तिघेही संभाजीनगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने सदावर्ते यांच्या वाहनाची तोडफोड करणाऱ्या आरोपींना आपला पाठिंबा दिला आहे. आरोपींच्या कृत्याचे समर्थन करता येणार नाही. पण आमचा त्यांना कायदेशीर पाठिंबा आहे. त्यांना आवश्यक ती सर्व कायदेशीर मदत पुरवली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.