वंचित बहुजन आघाडीवर (Vanchit Bahujan Aghadi) आपला जाहीर केलेला उमेदवार मागे घेण्याची नामुष्की आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांची उमेदवारी मागे घेतली आहे. इंदापूरमध्ये दशरथ मानेंच्या घरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी मंगलदास बांदल हेदेखील उपस्थित होते. त्यावरून वंचितवर मोठी टीका होत होती. वंचितच्या या धोरणाविरोधात बांदल यांनी भूमिका घेतल्यानं त्यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि रेखाताई ठाकूर यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - Lok Sabha Elections 2024: कल्याण मधून श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार; देवेंद्र फडणवीस यांनी केले जाहीर)
यापूर्वी वंचितनं अमरावती इथून आपला उमेदवार जाहीर केला होता. प्राजक्त पिल्लेवान या त्यांच्या उमेदवार होत्या. त्यांनाही अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितनं अर्ज न भरण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळं त्यांना या जागेवरही उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते.
बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.
मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला… pic.twitter.com/xLhMymXn3o
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 6, 2024
वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत 25 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर केले होते. त्यापैकी चार उमेदवार वंचितकडून बदलण्यात आले आहेत. रामटेकमध्ये वंचितकडून यापूर्वी शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र नंतर त्या ठिकाणी काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.