Lok Sabha Elections 2024: कल्याण मधून श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार; देवेंद्र फडणवीस यांनी केले जाहीर
Shrikant Shinde | (Photo Credits: Facebook)

देशात लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत. भाजपाने 'अबकी बार 400 पार' चा नारा दिला आहे. त्यामुळे मित्र पक्षांसोबत सारी गणित जुळवून सावधपणे सारे उमेदवार जाहीर केले जात आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा आणि विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उमेदवारी वरून देखील चर्चा रंगत असताना आज खुद्द देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच कल्याणचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे असतील असे जाहीर केले आहे.

श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध होता. परंतू देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवत मागील वेळेपेक्षा अधिकच्या मताधिक्याने आपण श्रीकांत शिंदेंना निवडून आणणार असल्याचं देवेंद्र फडणवीस नागपूर मध्ये म्हणाले आहे. आज भाजपाच्या वर्धापन दिनी देवेंद्र फडणवीसांनी ही मोठी घोषणा केली आहे. Hemant Patil and Bhavna Gawali: शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे, भावना गवळी यांचा पत्ता कट, एकनाथ शिंदे यांची 'ठाणे'दारी राहणार? 

दरम्यान श्रीकांत शिंदे यांच्या विरूद्ध ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कल्याण मध्ये दुहेरी लढत होणार आहे. श्रीकांत शिंदे कल्याण मध्ये हॅट्रिकच्या तयारीमध्ये आहेत. तर वैशाली दरेकर यांच्यासाठी ठाकरे गटाकडूनही जोरदार प्रचार केला जाणार आहे. रामदास कदम यांनीही कल्याण मधून जर श्रीकांत ठाकरेंना उमेदवारी मिळाली नाही तर राजकारण सोडेन असा  इशारा दिला होता. कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात शुक्रवारी रात्री बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ हा भाजपलाच मिळायला हवा, अशी ठाम भूमिका घेतली होती.

भारतामध्ये 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान मतदान होणार असून 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात 20  मे दिवशी मतदान होणार आहे.