Mahayuti Government Cabinet Expansion 2024: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आज (15 डिसेंबर) पार पडला. जवळपास 33 वर्षांनी नागपूर येथे झालेल्या विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion 2024) एकूण 37 आमदारांनी मंत्री म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. ज्यामध्ये भाजपच्या 17, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या 10 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 09 मंत्र्यांचा समावश (List of Maharashtra Cabinet Ministers) आहे. महायुतीमध्ये घटकपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (AP) पक्षांनी सत्तावाटप करताना प्रादेशिक समतोल राखण्याचा आणि शक्यतो सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळते. ज्यामध्ये तिन्ही पक्षांनी काही जुन्या तर काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली. तर काही जुन्या चेहऱ्यांना डच्चूही दिला. त्यामुळे विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर काहीसा उशीरा का होईना पण राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात आले आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळ आणि पक्षनिहाय खातेवाटप खालील प्रमाणे:
महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या तिन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली चालवल्या जाणाऱ्या सरकारमध्ये पक्षनिहाय खातेवाटप खालील प्रमाणे:
भारतीय जनता पक्षात संधी मिळालेले मंत्री
- देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
- चंद्रशेखर बावनकुळे
- चंद्रकांत पाटील
- गिरीश महाजन
- राधाकृष्ण विखे पाटील
- गणेश नाईक
- मंगलप्रभात लोढा
- जयकुमार रावल
- पंकजा मुंडे
- अतूल सावे
- अशोक उईके
- आशिष शेलार
- शिवेंद्रराजे भोसले
- जयकुमार गोरे
- संजय सावकारे
- नितेश राणे
- आकाश फुंडकर
शिवसेना पक्षात संधी मिळालेले मंत्री
- एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
- गुलाबराव पाटील
- दादा भुसे
- संजय राठोड
- उदय सामंत
- शंभूराज देसाई
- संजय शिरसाट
- प्रताप सरनाईक
- भरत गोगावले
- प्रकाश आबिटकर
राष्ट्रवादी काँग्रेस (AP) पक्षात संधी मिळालेले मंत्री
- अजित पवार (उपमुख्यमंत्री)
- हसन मुश्रीफ
- धनंजय मुंडे
- दत्तामामा भरणे
- आदिती तटकरे
- माणिकराव कोकाटे
- नरहरी झिरवाळ
- मकरंद जाधव-पाटील
- बाबासाहेब पाटील
दरम्यान, महायुती सरकारचा कॅबिनेट विस्तार पार पडला आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राज्यात सरकार अस्तित्वात आले असे मानले जात आहे. हे सरकार कोणत्या प्रकारे काम करते आणि जनतेच्या हिताचे उपक्रम राबवते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यास विकासकामांना वेग मिळतो, असे मानले जाते. त्यामुळे हे सरकार कोणत्या प्रकारचे उपक्रम राबवते, काही महत्त्वाचे आणि धोरणात्मक निर्णय घेते का, याबाबत उत्सुकता आहे.