प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सरकारने विधानसभेच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 21 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा केली होती. त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत सांगितले होते. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असल्याचे जाहीर केले. तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच येत्या 1 जानेवारी 2020 पर्यंत बँकांच्या मुख्यालयात 2 नोडल ऑफिसरची नेमणूक करावी असे आदेश ठाकरे सरकारकडून बँकांना देण्यात आला आहे.

जिल्हापातळीवर सुद्धा नोडल ऑफिसरची नेमणूक करण्यात यावी असे ही सांगण्यात आले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी ज्या खात्यामधून कर्ज घेतले असून त्याचे आधार कार्डला लिंक किंवा न लिंक केलेल्या खात्यासंदर्भात माहिती मागवण्यात आली आहे. त्यानुसार 7 जानेवारी पर्यंतचा वेळ देऊ करण्यात आला आहे. एवढेच नाही तर बँकांनी ग्राहकांना फोन करत खाते आधार कार्ड सोबत लिंक करण्याची सुचना द्यावी असे ही म्हटले आहे.(कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफी? महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील महत्त्वाचा निकष)

महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत राज्यातील सर्व छोटे-मोठे शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी ठरणार आहेत. हा लाभ घेताना शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. विशेष म्हणजे या कर्जमाफीसाठी कोणतीही अट ठेवली नाही. त्यामुळे कर्जमाफीची थेट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. प्रमुख्याने ज्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक जोडण्यात आला आहे त्यांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा होणार आहे.