![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/12/winter-380x214.jpg)
राज्यातील विविध भागात आता थंडीची चाहूल लागली आहे. अनेक भागात दाट धुक्यांनी चादर पांघरली असून आता हवेत गारठा जाणवायला सुरुवात झाली आहे. विदर्भातील ग्रामिण भागात कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली असुन कापूस, सोयाबिन यांसारख्या पिकांसाठी हे पोषक वातावरण आहे. तरी थंडीच्या या चाहूलने शेतकरी सुखावला आहे. विदर्भाप्रमाणेचं मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात देखील थंडी वाढली आहे. कोकणात तर गेल्या आठवड्यापासून कडाक्याची थंदी पडत आहे. तर आंब्याचा बहर येण्यास हे अगदीचं पोषक वातावरण आहे. सकाळच्या वेळेला सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं कोकणातली अनेक गावं धुक्यात हरवून गेली आहेत. दुपारच्या वेळेला कडाक्याचं ऊन आणि संध्याकाळी मात्र हवेत गारवा अशा प्रकारचं वातावरण सध्या कोकणात अनुभवायला मिळत आहे.
महाराष्ट्र प्रमाणेचं दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या भागातही थंडी पडायला सुरुवात झाली आहे. देशभरात आता कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली असल्याने नागरिक थंडीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्र्व्हल करताना दिसतात. तरी पर्यटकांसाठी हिवाळा ऋतु म्हणजे पर्यटनाची पर्वणीचं. गेल्या एका आठवड्यात हवामानात झपाट्याने बदल झाला आहे. रात्रीच्या वेळी आर्द्रतेचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. रात्री तापमानातही तीन ते चार अंश सेल्सिअसने घट झाली आहे. दरम्यान, आणखी थंडी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. (हे ही वाचा:- Satara Earthquake: कोयना परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का; भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक)
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशाचा निरोप घेतला आहे. परतीच्या पाऊस माघारी फिरला आहे. त्यामुळं सध्या राज्यात आकाश निरभ्र झालं आहे. याचा परिणाम म्हणून तापमानात (Temperature) घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे. या हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. तर दिवसा असलेल्या स्वच्छ सूर्य प्रकाशामुळे उन्हाचा चटका वाढून कमाल तापमानात वाढ झाली आहे.