राज्यभरात तापनात घसरण बघायला मिळत असुन विविध भागात थंडीमुळे चांगलीचं हुडहूडी भरल्याचं चित्र आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात देखील पार कमालीचा घसरला आहे. गावखेड्यात नागरिक शेकोटीचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे. तर शहरी भागात देखील थंडीमुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. तसेच वाढत्या थंडी बरोबर गरम कपड्यांच्या मागणीत देखील कमालीची वाढ झाली आहे. तरी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या तोंडावर राज्यात पर्यटकांची संख्याही वाढली आहे. तरी लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर सारख्या ठिकाणी देखील कडाक्याची थंडी पडतांना दिसत आहे. तसेच पर्यटक या गुलाबी थंडीचा मनसोक्त आनंद लुटतांना दिसत आहेत.
कमालीची बाब म्हणजे यावर्षी चक्क राज्याची राजधानी देखील गारठली आहे. तुरळक थंडीची जाणीव होणाऱ्या मुंबई शहरात काल यावर्षीच्या हिवाळ्याती सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. विशेष दक्षिण मुंबईत सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. उद्या देखील मुंबईतील किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केला आहे. तरी नाताळानंतर मुंबईत आणकीचं थंडी वाढण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून नोंदवण्यात आली आहे. (हे ही वाचा:- Nashik Winter Update: नाशिक मध्ये तापमानात घसरण; निफाड 7.8 अंश सेल्सिअस वर)
विदर्भातील नागपूर,वर्धा, यवतमाळ, अमरावती या शहरांमध्ये देखील तापमानाची घसरण बघायला मिळत आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर या भागात देखील थंडीमुळे चांगलीचं हुडहुडी भरली आहे. ही थंडी मात्र रब्बी हंगामातील पिकांसाठी चांगली आहे. वाढती थंडी पिकांच्या वाढीसाठी पोषक आहे. यामुळं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.