नाशिक मध्ये पुन्हा तापमानात घसरण झाल्याने थंडीने नागरिक कुडकुडले आहेत. आज नाशिक मध्ये किमान तापमान 10.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे तर निफाड मध्ये हा तापमानाचा पारा 7.8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आहे. नागरिक थंडीने कुडकुडत असले तरीही रब्बी पिकांसाठी मात्र हे हवामान अनुकूल मानलं जात आहे. नक्की वाचा: Mumbai Weather Updates: मुंबई थंडीची हुडहुडी वाढली; यंदाच्या मोसमातील निच्चांकी तापमानाची नोंद!
पहा ट्वीट
#नाशिकचा पारा पुन्हा घसरला असून #थंडीचा कडाका वाढला आहे. मध्यंतरी १९ अंश सेल्सिअस तापमान होते मात्र आज १०.३ अंश सेल्सिअस इतकी किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर निफडला ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ही थंडी रब्बी पिकांसाठी उपयुक्त आहे.@InfoNashik #WeatherUpdate
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) December 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)