महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत असे हवामान विभागाने म्हटले आहे. या चार दिवसांमध्ये राज्यात उष्मा वाढणार (Maharashtra Weather Report) असून काही ठिकणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल. प्रामुख्याने कोकणातही (Konkan) अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाठिमागील दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी काही प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली. या पर्जन्यवृष्टीचा फटका प्रामुख्याने सांगली जिल्ह्यातील
हवामान विभागाने म्हटले आहे की, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्म्याचे प्रमाण वाढेल. या प्रदेशात वातावरण ढगाळ राहील. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत पाऊस पडेल. तर कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. (हेही वाचा, Summer Lifestyle according to Ayurveda: उन्हाळ्यात तुमची लाइफस्टाईल कशी असावी? आहार कसा असावा? जाणून घ्या आयुर्वेदाचार्य याबद्दल काय सांगतात )
पाठिमागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. सांगलीमध्ये तर वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. या पावसाने द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. दुसऱ्या बाजूला कोकणातही (सिंधुदुर्ग) दिवसभर पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळाले. राज्यातील तापमानातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दरवर्षीची पाहता यंदा उष्णतेची लाट ससासरीच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे सध्या राज्यातील जनतेला उन्हाची काहीली आणि उकाड्याला सामोरे जावे लागते आहे.
ट्विट
#सांगली शहरात वादळी वाऱ्यासह #अवकाळी पावसाची जोरदार हजेरी .मिरज तालुक्यातील पूर्व भागासह अनेक ठिकाणी गारांचा #पाऊस पडला @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/tvzUUoApEu
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 5, 2022
हवामान विभागाने म्हटले आहे की, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, विदर्भातील अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ येथे पुढचे काही काळ पावसाची शक्यता अधिक प्रमाणात पाहायला मिळते आहे.