Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

राज्यात गेल्या काही दिवासांपासून अवकाळी पाऊस होत आहे. कोल्हापूर, साताऱ्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. त्यानंतर आता पुणे (Pune), नाशिक (Nashik), सातारा (Satara) जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी वर्तवला आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली असून शेतकऱ्यांसह नागरिकांना देखील काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नाशिकच्या सटाणा तालुक्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहरातही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट देखील सुरुवात झाली आहे.

K S Hosalikar Tweet:

(हे ही वाचा: नाशिक: अवकाळी पाऊस सोबत वीजतोडणीने चिंतेत भर पडल्याने शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप; उर्जामंत्री नितीन राऊत, महावितरण अधिकारी वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी)

कोल्हापूरमध्ये कालपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून आजही पावसाने हजेरी लावली आहे. कागल, चंदगड आणि भुदरगड तालुक्‍यातील गारपीट देखील झाली. राज्यात होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान होत असून नाशिकमध्ये कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, यापूर्वी मार्च महिन्यात देखील अवकाळी पावसाने राज्यातील काही भागांमध्ये हजेरी लावली होती.