
Maharashtra Rainfall Update: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नवी दिल्ली येथून महाराष्ट्रासाठी 5 दिवसांचा हवामान अंदाज (Maharashtra Weather ) वर्तवला आहे. या अंदाजानुसार कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात कोरडे हवामान (Konkan Dry Weather) राहण्याची शक्यता आहे, तर दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता (Rainfall in Maharashtra) वर्तवण्यात आली आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील जिल्हानिहाय हवामान अंदाज (17 एप्रिल – 21 एप्रिल 2025)
जिल्हा | 17-04-2025 | 18-04-2025 | 19-04-2025 | 20-04-2025 | 21-04-2025 |
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर | कोरडे | कोरडे | कोरडे | कोरडे | कोरडे |
रत्नागिरी, सिंधुदुर्ग | हलका पाऊस / विजांचा कडकडाट | कोरडे | कोरडे | कोरडे | हलका पाऊस |
पुणे, सातारा, कोल्हापूर | उष्ण व दमट हवामान | कोरडे | दमट हवामान | हलका पाऊस | हलका पाऊस |
सोलापूर, लातूर, धाराशिव | हलका पाऊस / दमट हवामान | दमट हवामान | दमट हवामान | दमट हवामान | हलका पाऊस |
नाशिक, जळगाव, धुळे | दमट हवामान | दमट हवामान | कोरडे | कोरडे | दमट हवामान |
औरंगाबाद, जालना, परभणी | दमट हवामान | कोरडे | दमट हवामान | दमट हवामान | कोरडे |
नांदेड, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर | वादळी वारे व विजा | कोरडे | कोरडे | कोरडे | हलका पाऊस |
हवामान इशारे (Warnings by IMD):
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह (30–40 किमी/तास) विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
- कोकण व उत्तरेकडील महाराष्ट्रात कोरडे हवामान.
- नाशिक, जळगाव, पुणे, सोलापूर या भागांमध्ये उष्ण व दमट हवामान.
शेतकऱ्यांना सल्ला (Agromet Advisory):
बदलते वातावरण आणि हवामान अंदाज पाहता शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी प्रामुख्याने पिकांची कापणी शक्य तितक्या लवकर करावी व शेतातील आपले उत्पादन अधिक सुरक्षित ठिकाणी ठेवावे. काढणी केलेली धान्ये, भाजीपाला योग्य प्रकारे झाकून ठेवावेत. कोवळी फळझाडे व भाजीपाला रोपांना आधार द्यावा. पावसाच्या शक्यतेमुळे सिंचन व कीटकनाशक फवारणी टाळावी. भारतीय हवामान विभागाने 17 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता आपले हवामान बुलेटीन प्रसिद्धीस दिले आहे.
आयएमडी काय म्हणते आहे?
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 17, 2025
दरम्यान, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने कमकुवत झाडे किंवा इमारती कोसळण्याची शक्यता आहे. अशा वेळी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. खास करुन वीजेचे खांब, शेत उपकरणे यामुळे शॉकचा धोका उद्बवतो. अशा वेळी ढगांच्या गडगडाटात उघड्यावर काम करू नये, मोबाईल/इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावीत.