महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्षाकडून निवडणुक प्रभारी म्हणून भुपेंद्र यादव यांची नियुक्ती
भुपेंद्र यादव (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रात (Maharashtra) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) राजकीय पक्षांची घौडदौड सुरु झाली आहे. तसेच गेल्या काही दिवांपासून राजकीय पक्षांतरच्या गोष्टीसुद्धा समोर आल्या होत्या. याच पार्श्वभुमिवर आता भाजप (BJP) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी भुपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांची निवडणुक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

तसेच भुपेंद्र यांच्यासह केशव प्रसाद मौर्य आणि लक्ष्मण सावदी यांना उप-निवडणूक प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे. तर प्रदेश संगठ प्रभारीची जबाबदारी सुश्री सरोज पाण्डेय यांच्यावर सोपण्यात आली आहे. मात्र अमित शहा यांनी केलेली ही नियुक्त तत्काळासाठी असणार आहे.(अखेर ठरलं! अडीच अडीच वर्षांसाठी असणार भाजप आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री; वरूण सरदेसाई यांची माहिती)

देशात लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवत मोदी सरकारला त्यांची सत्ता पुन्हा स्थापन करण्यात यश आले आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणूक कोणता पक्ष बाजी मारणार याकडे आता सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.