Nagpur: राज्यात कोरोबाधितांचा दिवसागणिक आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना सध्याच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत स्वत:सह आपल्या परिवाराची सर्वोतोपरी काळजी घ्यावी असे वारंवार आवाहन केले जात आहे. त्याचसोबत कोविडच्या नियमांचे सुद्धा पालन करावे अशा सुचना जाहीर केल्या आहेत. दुसऱ्या बाजूला आरोग्य सेवेतील कर्मचारी दिवसरात्र रुग्णंवर उपचार करत आहेत. याच पार्श्वभुमीवर आता नागपूर येथील दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील MBBS च्या इंटर्नकडून संपाचा इशारा दिला गेला आहे. यामध्ये जीएमसी आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांचा समावेश आहे.
या दोन वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नकडून कोविडच्या वॉर्डात काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ते उद्यापासून संपावर जाण्याची शक्यता आहे. तर गेल्या वर्षात मुंबई आणि पुणे येथील इंटर्न डॉक्टर्सला ज्या प्रमाणे कोविडच्या कामासाठी वेगळे मानधान दिले गेले. त्याचप्रमाणे मानधन नागपूरातील इंटर्नस डॉक्टरांना ही द्यावे अशी मागणी केली आहे. तर ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संपावर जाणार असल्याचा इशारा इंटर्नस डॉक्टरांनी दिला आहे.(हेही वाचा- Nagpur: कोरोना संकटात अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, नागपूर येथील धक्कादायक प्रकार)
>>काय आहेत इंटर्नस डॉक्टरांच्या मागण्या?
-मुंबई आणि पुणे येथील इंटर्न डॉक्टरांप्रमाणे राज्यातील सर्व इंटर्न डॉक्टरांना 50 हजारांचे मानधाव द्यावे.
-कोविड सेंटरमध्ये काम केल्यानंतर आयसोलेशनची व्यवस्था करण्यात यावी. त्याचसोबत आजारी पडल्यास उपचाराची जबाबदारी शासनाने घ्यावी.
-विमा कवच इंटर्न डॉक्टरांना शासनाकडून देण्यात यावा.
-प्रतिदिनी 300 रुपये जेवण, प्रवास प्रोत्साहन भत्ता सुद्धा द्यावा.
त्याचसोबत रुग्णालयातील नर्सला प्रशासनाकडून प्रत्येक दिवसासाठी 1 हजार रुपये भत्ता दिला जात आहे. परंतु हा भत्ता इंटर्न डॉक्टरांना दिला जात नसल्याने आम्हाला कमी वेतनातच काम करावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी नागपूर महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि अधिष्ठता यांना गेल्या वर्षात सप्टेंबर मध्ये एक निवेदन सुद्धा दिले गेले आहे. परंतु अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा निवदेन देणार असून त्या संबंधित लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप सुरु ठेवणार असल्याचे इंटर्न डॉक्टरांनी म्हटले आहे. जर हे इंटर्न डॉक्टर्स संपावर गेल्यास आरोग्य सेवेवर परिणाम होईल हे नक्कीच.