Maharashtra Board Supplementary Results 2019: HSC आणि SSC च्या पुरवणी परिक्षेचे निकाल लवकरच होणार जाहीर, विद्यार्थ्यांना maharesults.nic.in वर पाहता येणार
Results 2019 (Archived, edited, representative images)

Maharashtra Board Supplementary Results 2019: महाराष्ट्र बोर्ड लवकरच अकरावी आणि बारावीच्या पुरवणी परिक्षेचे निकाल जाहीर करणार असल्याच्या तयारीत आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र बोर्ड ऑफ सेंकंडरी अॅन्ड एज्युकेशन प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही निकाल ऑनलाईन पद्धतीने घोषित करणार असून त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना तो पाहता येणार आहे.

बोर्डाने बारावीची पुरवणी परिक्षा 17 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान घेतली होती. तर अकरावीची पुरवणी परिक्षा 17 जुलै ते 30 जुलै दरम्यान पार पडली होती. मात्र आता लवकरच या परिक्षेचे निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षात MSBSHSE पुरवणी परिक्षेचे निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर करण्यात आले होते. मात्र यंदा कोणत्या तारखेला पुरवणी परिक्षेचा निकाल जाहीर होणार हे अद्याप ठरवण्यात आलेले नाही. परंतु विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट maharesults.nic.in येथे निकाल पाहता येणार आहेत.(बारावी बोर्ड परिक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतिसाठी विद्यार्थ्यांना 400 रुपये मोजावे लागणार?)

या वर्षी बारावीची परिक्षा मार्चमध्ये पार पडण्यात आल्यानंतर 28 मे रोजी त्याचे निकाल जाहीर करण्यात आले. तसेच बारावी बोर्ड परिक्षेसाठी 14,21,936 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून त्यामधील 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दहावी बोर्ड परिक्षेच्या निकालाचा टक्का घसरला असून 77.10 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.