![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/04/Untitled-design-91-380x214.jpg)
Maharashtra SSC-HSC Board Re-Exam 2019: यंदा दहावी-बारावी बोर्ड परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा येत्या 17 जुलैपासून सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता जूनच्या महिन्यात पुन्हा एकदा परिक्षेचा अभ्यास करण्यास वेळ मिळणार आहे.
दहावी बोर्ड परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 17 ते 30 जुलै दरम्यान पार पडमार आहे. तर बारावीची फेरपरीक्षा 17 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत पार पडणार आहे. त्याचसोबत प्रात्यक्षिक आणि श्रेणी विषयांचा परीक्षा 9 ते 16 जुलै रोजी शाळा-कॉलेजस्तरावर घेतल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेचे वेळापत्रक maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard येथे पाहता येणार आहे. मात्र संकेतस्थावर देण्यात आलेले वेळापत्रक फक्त माहितीसाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. तर परिक्षेपूर्वी मिळणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव यांनी स्पष्ट केले आहे.