Maharashtra: महात्मा जोतीराव फुले (Jyotirao Phule)आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांनी मागास वर्गातील समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यामध्ये व्यथित केले आहे. तर देशातील महिलांसाठी प्रथमच शाळा सुरु करणाऱ्या सावित्रीबाई यांनी स्वत: ही शिकत होत्या. याच पार्श्वभुमीवर सावित्रीबाई यांची जयंती ही 'महिला शिक्षण दिन' म्हणून साजरा करण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी त्याचा स्विकार करत महिला शिक्षण दिन साजरा केला जाईल असे आश्वासन दिले आहे.(KDMC: वगळलेली 'ती' 18 गावे आता कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतच; मुंबई उच्च न्यायायालयाचा निर्णय)
सावित्रीबाई फुले यांच्यावर सामाजिक बहिष्कार, लोकांकडून दगडांचा मार सहन केला पण त्यांनी महिलांना शिकवणे सोडले नाही. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा महिला शिक्षण दिन साजरा केला जावा अशी मागणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे केली जाणार आहे. तसेच छगन भुजबळ यांनी अन्य मागासवर्गीयांच्या आरक्षासाठी राज्य सरकारकडून उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जेष्ठांसह अनुभवी विधीज्ञांची नेमणूक करण्यासाठी एक निवदेन ही उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवले आहे. (Employment in Maharashtra: महाराष्ट्र सरकारचा कोरोना काळात बेरोजगारीवर मात करण्याचा प्रयत्न; तब्बल 1 लाख 32 हजार लोकांना मिळाला रोजगार)
दरम्यान, छगन भुजबळ यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. उद्धव ठाकरे यांनी असे म्हटले की, मागासवर्गीय किंवा अन्य प्रवर्गातील समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही. तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वकिलांच्या नेमणूकींबद्दल ही मागणी उद्धव ठाकरे यांनी तत्काळ मान्य केली आहे.