Maharashtra Weather Update: राज्यात आज पासून येत्या 20 ऑगस्टपर्यंत कमी पावसाची शक्यता दर्शवली आहे. राज्यात काही ठिकाणीच किरकोळ पावसाची (Rain) शक्यता जाणवत आहेय. मुंबईसह कोकणात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता दर्शवली आहे. हवामान विभागाने राज्यात 'पाऊस-खण्ड ' प्रणालीमुळे महाराष्ट्रातील खरीपातील जिरायत क्षेत्र पिकांना ओढ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 21 ऑगस्ट नंतर पावसाची शक्यता दर्शवली आहे. कमी पावसाने पुन्हा अनेक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या या दोन महिन्यात पाऊस कमी असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या वर्षात आधीच मान्सून लांबणीवर गेला होता. दरम्यान जुन महिन्याच्या शेवटच्या आढवड्यात जोरदार पाऊसाने हजेरी लावली होती. बंगालच्या उपसागरातील आर्द्रता ईशान्येकडे म्हणजे प्रशांत महासागरातील दक्षिण कोरियन किनारपट्टीवरील 'खनून' तर जपान किनारपट्टीवरील 'लान' नावाच्या दोन चक्रीवादळानीं (टायफुन) खेचल्यामुळे देशातील दक्षिणेकडील पाच राज्याबरोबर महाराष्ट्रात ह्या पंधरवाड्यात पावसाची उघडीप पाहवयास मिळत आहे.