Maharashtra Rain Forecast: राज्यात 9 सप्टेंबर पासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता- IMD
Monsoon | (Photo Credits: Pixabay.com)

मागील काही दिवसांपासून मुंबई (Mumbai) आणि उपनगरांसह मध्य महाराष्ट्र (Madhy Maharashtra), मराठवाडा (Marathwada), कोकण (Konkan), विदर्भात (Vidharbha) धुव्वाधार पाऊस होत आहे. पुढच्या 48 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. गणपती आगमनाला काही दिवस बाकी असताना होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिक चिंतातूर झाले आहे. मात्र 9 सप्टेंबर पासून राज्यात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यामुळे बाप्पाच्या आगमनात कोणतीही अडचण नसेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

तसंच पुढील 2-3 दिवसांसाठी हवामानाचे इशारेही देण्यात आले आहेत. 8 सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट असून पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 9 सष्टेंबर रोजी ठाणे, पालघर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. तर 10 सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरीसाठी येल्लो अलर्ट आहे. 11 सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग साठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

K S Hosalikar Tweets:

राज्यात मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.