Eknath Shinde | (Photo Credit - Facebook)

शिवसेना (Shiv Sena) बंडखोर आमदारांचा एक गट घेऊन गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कायदेशीर लढाईसाठी चाचपणी सुरु केली आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनाच निलंबीत करण्याची मागणी शिंदे गटाकडून केली जाऊ शकते. शिंदे गट हा कोर्टामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेकडून नव्याने नियुक्त केलेल्या विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांच्याच नियुक्तीला आव्हान देण्याचीही शक्यता आहे. बंडखोर आमदारांचे म्हणने आहे की, एकनाथ शिंदे हेच पहिल्यांदा शिवसेनेचे विधिंडळ गटनेते होते. आता उद्धव ठाकरे यांच्या गटाने विधिंडळ गटनेता बदलला आहे. पण हा बदल बेकायदेशीर आहे. विधिंडळ गटनेता बदलण्यसाठी 37 आमदाराच्या सह्यांची आवश्यकता आहे.

एकनाथ शिंदे यांना शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटविण्याची कारवाई महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींनी केली आहे. याशिवाय शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीशीविरोधात काय कायदेशीर रणनिती आखता येऊ शकते याबाबतही विचारविनिमय करण्यासाठी शिंदे गटांच्या आमदारांची आज दुपारी बैठक आयोजित करण्यात आली आहे.  (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्या गटात चलबिचल, आमदारांचे मध्यस्थीसाठी महाराष्ट्रात शिवसेना नेत्यांना फोन)

ट्विट

दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचे बंड मोडून काढण्यासाठी महाविकासाघाडीही सक्रिय झाली आहे. खास करुन मविआचे प्रणेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे स्वत: सक्रीय झाले आहेत. त्यामुळे आता ही लढाई केवळ शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न म्हणून सोडला जाणार नाही तर, मविआ म्हणून सोडवला जाणार आहे. परिणामी आगामी काळात कायदेशीर लढाईला तोंड द्यावे लागू शकते. याचाच विचार करुन सरकार टीकविण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशिर लढाई मविआ एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवास्थानी मविआच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार दिल्लीला जाणार असल्याची सूत्राची माहिती आहे.