Nagpur News: 11 वर्षाच्या मुलाची राहत्या घरात आत्महत्या, कारण अस्पष्ट, नागपुरात खळबळ
Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Nagpur News: नागपूर (Nagpur) शहरात एका 11 वर्षाच्या मुलाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील हिंगणा तालुक्यातील डिगडोह परिसरातील ही घटना आहे. घरातल्या एका खोलीत त्यांने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही गोष्ट अनपेक्षितपणे घडल्याची नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे आणि या पुढील तपासणी सुरु केली आहे.

शहरातील डिगडोह गावात एका ११ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली पण या आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट आहे. त्यामुळे गावकऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटने अंतर्गत कुटूंबियांशी चौकशी केली तर याबाबत त्यांनाही काहीच माहित नसल्याचे सांगितले. त्यामुळे आत्महत्येचं कारणही अस्पष्ट आहे. एमआयडीसी पोलीसांनी आकस्मक मृत्यू झाल्याची नोंद घेतली आहे. या घटनेअंतर्गत पोलीसांनी तपास सुरु केला आहे.

मुलांमध्ये आत्महत्याचे प्रमाण वाढत चालले आहे. काल आयटी अभियंता मुलाने पुण्यात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. आर्थिक संकटातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, तसा उल्लेख आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे.