तेलंगणा राज्यात एका सुपरमार्केटमध्ये रेफ्रिजरेटर उघडण्याच्या प्रयत्नात एका चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. निजामाबाद जिल्ह्यातील नवीपेठ तालुक्यात सोमवारी ही दुःखद घटना घडली. ही संपूर्ण घटना सुपरमार्केटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ही मुलगी आपल्या वडिलांसोबत सुपरमार्केटमध्ये गेली होती. वडील फ्रीजमध्ये आईस्क्रीम शोधत असताना मुलगी चॉकलेट घेण्यासाठी शेजारील फ्रिजकडे गेली. या फ्रीजच्या दरवाजाला स्पर्श करताच तिला विजेचा धक्का बसला. वडिलांनी ताबडतोब मुलीला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आता मुलीच्या पालकांनी आणि इतर नातेवाईकांनी तिचा मृतदेह घेऊन सुपरमार्केटसमोर निदर्शने केली आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Ghaziabad: 'जय माता दी' स्टिकर असलेल्या वाहनाला दंड ठोठावल्याने हिंदू गटाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)