Ghaziabad: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका हिंदू संघटनेचा अध्यक्ष गाझियाबाद (Ghaziabad) मध्ये ट्रॅफिक पोलिस (Traffic Police) कॉन्स्टेबलसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. हिंदू रक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पिंकी चौधरी आणि गाझियाबाद ट्रॅफिक पोलिस कॉन्स्टेबल यांच्यात झालेल्या बाचाबाचीची घटना सोशल मीडियावर चांगलीचं व्हायरल झाली आहे. एका कारला हवालदाराने दंड ठोठावल्यानंतर हा वाद झाला.
हिंदू रक्षा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षासह त्यांचे काही अनुयायी ट्राफिक पोलिसासोबत वाद घालताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिसांशी काही मिनिटांच्या वादानंतर पिंकी चौधरी आत आले आणि त्यांनी वाहतूक पोलिस कॉन्स्टेबलवर आरडाओरडा केला. (हेही वाचा - Maruti 800 into Rolls Royce: केरळ मध्ये तरूणाने मारूती 800 चं रोल्स रॉयस मध्ये केलं रूपांतर; सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल (Watch Video))
#Ghaziabad- हिंदू रक्षा दल के राष्ट्रीय अध्यक्ष पिंकी चौधरी और गाजियाबाद ट्रैफिक पुलिस कर्मी के बीच हुई जमकर बहस,जय माता दी लिखे होने पर काटा चालान,वीडियो हो रही है जमकर वायरल@Uppolice @uptrafficpolice @ghaziabadpolice @Gzbtrafficpol @HinduRakshak @VHPDigital @HinduRakshaDal pic.twitter.com/Jl3zSrPuHv
— विभोर अग्रवाल🇮🇳 (@IVibhorAggarwal) October 2, 2023
कॉन्स्टेबलवर आरडाओरडा केल्यानंतर पिंकी चौधरीने कॉन्स्टेबलचा मोबाईलही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पिंकी चौधरीने ट्रॅफिक पोलिस कॉन्स्टेबलला त्याच्या वरिष्ठांना फोन करण्यास सांगितले. तसेच हिंमत असेल तर 'योगी'ला कॉल करण्यास सांगितले. परंतु, वाहतूक पोलीस हवालदार संयमाने उभे राहिले. त्यांनी पिंकी चौधरी आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांचे कृत्य आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केले.