Maruti 800 into Rolls Royce: केरळ मध्ये तरूणाने मारूती 800 चं रोल्स रॉयस मध्ये केलं रूपांतर; सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल (Watch Video)
Maruti 800 in RR | YouTube

लक्झरी गाड्यांचं वेड सार्‍यांनाच असतं पण त्या सार्‍यांच्याच आवाक्यात असतातच असं नाही. सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर सध्या एक व्हिडिओ तुफान वायरल होत आहे ज्याने सार्‍या कारप्रेमींचं लक्ष वेधलं आहे. केरळ मधील 18 वर्षीय Hadif या मुलाने चक्क मारूती 800 ला Rolls Royce चा लूक दिला  आहे. Fazil Basheer च्या Tricks Tube या युट्युब चॅनेल वर कारचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

केरळच्या या मुलाने कस्टमायझेशनचं टॅलेंट वापरून Rolls Royce ची प्रतिकृती बनवली आहे. लोगो पासून अन्य लूक्स सारेच रॉल्स रॉयल प्रमाणे बनवण्यासाठी त्याने कल्पकता वापरली आहे. यामध्ये मोठ्या ग्रिल्स, भलं मोठं बोनेट, रिडिझाईन केलेलं बम्पर, एलईडी डीआरएल्स बनवून मारूती 800 ला रॉल्स रॉयलचा लूक देण्यात आला आहे.

पहा गाडीचा लूक

सोशल मीडीयात या रॉल्स रॉयल प्रमाणे दिसणार्‍या गाडीचा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर अनेकांनी कौतुक केले आहे. मुलाच्या कल्पकतेने काही जण थक्क देखील झाले आहेत. मारूती 800 मॉडिफाईड केलेल्याचे यापूर्वीही काहींचे व्हिडीओ तुफान शेअर झाले आहेत.