Monsoon | Representative Image (Photo Credits: Pixabay)

राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगमनातच सामसूम झालेला मान्सून (Monsoon 2022) पुन्हा एकदा महाराष्ट्रभर सक्रीय होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे चित्र कायम राहणार की त्यावरही पावसाचे पाणी फिरणार याबाबत उत्सुकता आहेच. दरम्यान, आज मध्यरात्रीनंतर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने तडाखेबंद सुरुवात केली. पावसाचा एकूण रागरंग पाहता मुसळधार पावसाची ही कामगिरी पुढेही कायम राहू शकते असे दिसते. दरम्यान, हवामान विभागाने (Meteorological Department) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' (Orange Alert) जारी केला आहे.

हमावान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम किनारपट्टी असलेल्या प्रदेशात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी हवामान ढगाळ राहणार आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही पावसाची कामगिरी दमदार पाहायला मिळू शकते. सध्या ढगाळ वातावरण असलेल्या कोकण किनारपट्टीलगत मुसळधार पवासाचीशक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यातही वातावरण ढगाळ आहे. तर, घाटमाथ्यावर दमदार पाऊस आहे. (हेही वाचा, मुंबईच्या रिमझिम पावसात चेंबूर मध्ये घरावर दरडीचा काही भाग कोसळल्याने दुर्घटना; 2 भाऊ जखमी)

ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई

ट्विट

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यासह जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यांमध्येही दमदार पावसाची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. मराठवाड्यातही तुरळक पावसाने विविध ठिकाणी हजेरी लावल्याचे पाहायला मिळते आहे.

ट्विट

मान्सूनचे आगमन यंदा काहीसे लवकर होईल, असे हवामान विभागाने म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र उलटेच घडले. हवामान विभागाने दर्शवलेल्या अंदाजानुसार पाऊस लवकर येणे तर सोडाच. उलट नियमीत वेळेतही दाखल न होता पाऊस (मान्सून) काहीसा अधिकच रेंगाळला. त्यामुळे राज्यातील समस्त शेतकरी वर्ग पावसाकडे डोळे लावून बसला होता. अखेर वरुनराजा बरसू लागल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.